पत्नी, सासरा अन् दोन मेहुण्यांनाची धारदार शस्त्राने हत्या
यवतमाळ। नगर सहयाद्री-
यवतमाळ जिल्ह्यात एक भयंकर घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. एका सनकी जावयाने धारदार शस्त्राने वार करत सासुरवाडीतील पत्नी,दोन मेहुणे आणि सासऱ्याची धारदार शस्राने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. गोविंद विरचंद पवार असे आरोपी जावयाचे नाव आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर भोसले कटूंब वास्तव्यास आहे. गोविंद पवार यांचा विवाह भोसले यांच्या कन्येशी झाला होता. विवाहनंतर चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. पत्नीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचा गोविंद याला संशय होता.
गोविंद नेहमी पत्नीला मारहाण करीत होता. त्यामुळे कंटाळून ती गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहत होती.याच कारणावरून गोविंदचे पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांसोबत सतत वाद सुरू होते.दरम्यान पती काल मध्यरातत्री पत्नीच्या माहेरी पोहचला आणि सासरच्या लोकांवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला.
या घटनेत या घटनेत गाेविंद पवार याचा सासरा पंडित भाेसले, मेहूणा ज्ञानेश्वर भोसले आणि सुनील भोसले, पत्नी रेखा यांचा मृत्यू झाला असून आरोपी गोविंद पवारला पोलिसांनी अटक केली आहे.