spot_img
अहमदनगरठाकरे गटाला धक्के पे धक्का! 'दिग्गज' नेता साथ सोडणार?

ठाकरे गटाला धक्के पे धक्का! ‘दिग्गज’ नेता साथ सोडणार?

spot_img

Maharashtra Politics:विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. ठाकरे गटातून अनेक नेते शिंदेंच्या शिवसेनेत जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणातील काही नेत्यांनी ठाकरे गाटाला राम राम केला होता. मुंबई, छत्रपतीसंभाजीनगरातूनही अनेक जणांनी ठाकरेंची साथ सोडली होती. आता यामध्ये आणखी भर पडली आहे. रत्निगरी जिल्ह्यातही ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे.

माजी आमदार सुभाष बने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाची तारीखही ठरली आहे. त्याशिवाय रोहन बने सुभाष बने, गणपत कदम यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ फेब्रुवारी रोजी कोकणाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी रत्नागिरीमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने आणि सुभाष बने देखील मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेणार आहत. सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात मोठी ताकद आहे. त्याचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा फायदा होईल, असे म्हटले जातेय. त्याशिवाय माजी आमदार गणपत कदम यांचा देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश निश्चित झालाय. कदम हे राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. माजी आमदार राजन साळवी हे ठाकरे गटात नाराज असल्याचे सांगितले जातेय, ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. साळवी यांच्या पक्षप्रवेशाचाही मुहूर्त ठरल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...