spot_img
अहमदनगरअहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार; ११ नगरसेवकांचा जय महाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार; ११ नगरसेवकांचा जय महाराष्ट्र

spot_img

शहरप्रमुखासह, माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी मुबईकडे रवाना / संध्याकाळी होणार प्रवेश

अहिल्यानगर / नगर सह्याद्री – विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दणदणीत यश मिळाले. त्यामुळे ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ आता अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह तब्बल 11 नगरसेवकांनी जय महाराष्ट्र केला असल्याची माहिती आहे. तसेच 11 आजी माजी नगरसेवकांसह पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रवाना झाले आहेत.

अहिल्यानगर महापालिकेत आत्तापर्यंत सर्वांधिक नगरसेवक ठाकरे गटाचे निवडून आले आहेत. त्यामुळे चार वेळा ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर झालेला आहे. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगर शहर विधानसभा मतदारसंघातील जागा महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला न दिल्याने शिवसेनेचे पदाधिकारी नाराज होते. तसेच पक्ष सोडण्याच्या तयारीत होते.

नाराज नगरसेवकांनी मध्यंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. तसेच 30 जानेवारीचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला होता. त्यामुळे गुरुवारी सकाळीच ठाकरे गटाचे शहर प्रमुख, माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन मुंबईकडे रवाना झाले आहेत. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव, बाबूशेठ टायरवाले, रणजित परदेशी, रोहित लोखंडे, योगेश गलांडे, अक्षय कातोरे आदी यावेळी उपस्थित होते.

शिंदे सेनेत कोणाकोणाचा प्रवेश
शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेंडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, परेश लोखंडे, संतोष गेणप्पा, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, विजय पठारे आदींसह माजी नगरसेवक सुरेश तिवारी,उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, अरुण झेंडे, रमेश खेडकर, अभिजित अष्टेकर, बंटी खैरे, कैलास शिंदे, संतोष तनपुरे, प्रवीण बेद्रे, चेतन शिरसुल, अण्णा घोलप, सागर थोरात, अभिजित दहिहंडे, अनिकेत आरडे, असिफ पटवेकर, ऍड सतीश गीते आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...