spot_img
अहमदनगरजामिनावर सुटलेल्या आरोपीचे 'भयंकर' कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची व तिला गर्भवती करून मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मातेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे (वय ३६, रा. तळेगाव दिघे) याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ज्ञानेश्वर बोडखेने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. यामुळे ती गर्भवती राहिली आणि प्रसूतीसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिने एका मुलीला जन्म दिला. अल्पवयीन मातेने या संदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार, ज्ञानेश्वर बोडखे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला अटक
मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते यांनी आरोपीला संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर उभे केले असता जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी आरोपीस २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले.

मागील प्रकरण
दरम्यान, आरोपीवर शेतमजुरी करणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. मात्र, दुसऱ्या प्रकरणात आरोपी अडकला असून त्याचा जामीन रद्द केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे./

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...