Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेत आता ज्या महिलांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सरकारने आता ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहेत त्यांची लिस्ट काढण्यास सुरुवात केली आहे.
जर कोणतीही महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत सरकार मोठी अॅक्शन घेण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे २५ टक्के महिलांचे अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारचे पैसे वाचू शकतात. ९०० कोटी रुपये दर महिन्याला वाचू शकतात असं सांगितलं जात आहे.
इन्कम टॅक्स भरत असलेल्या कुटुंबियांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचसोबत आता पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय स्वतः महिलांनी घ्यायचा आहे, असं सांगितलं जात आहे.
याचसोबत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाही पैसे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. तब्बल २५ लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहे. तर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा ९४ लाख महिला लाभार्थी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या योजनेत या महिलांना लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.