spot_img
अहमदनगरलाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार! नगर जिल्ह्यातील 'या' महिला ठरणार अपात्र?, कारण आलं...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार! नगर जिल्ह्यातील ‘या’ महिला ठरणार अपात्र?, कारण आलं समोर..

spot_img

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत गरीब कुटुंबातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र आता लाभ घेणार्‍या महिलांची पडताळणी राज्य पातळीवरून सुरू करण्यात आली आहे. यासाठी सरकार पातळीवरून परिवहनकडे नोंदणी असलेल्या महिलांची यादी प्रत्येक जिल्ह्याच्या महिला बालकल्याण विभाग पाठवण्यात आली होती. या यादीनूसार जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेत पात्र ठरलेल्या आणि आर्थिक लाभ घेतलेल्या महिलांची पडताळणी करण्यात येत आहे.

सुत्रांच्या माहितीनूसार नगर जिल्ह्यात दीड हजार महिलांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे समोर आले आहे. या सर्व महिलांची माहिती आता सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात बारा लाखांहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असून लाभ घेणार्‍या पात्र महिलांची आता सरकार पातळीवरून पडताळणी करण्यात येत आहे. एकीकडे राज्य सरकार पातळीवरून ही योजना बंद करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी योजनेत पात्र नसतांनाही लाभ घेणार्‍यांची शोध मोहीम सरकारच्यावतीने सुरू करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत सुरुवातीला केवळ महिलांच्या प्रतिज्ञापत्रा आधारे त्यांचा या योजने समावेश करण्यात आला. तसेच त्यांना महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत सुरू करण्यात आली. एकट्या नगर जिल्ह्यात या योजनेत 12 लाखांहून अधिक महिला पात्र करण्यात आल्या होत्या. सुरुवातीचे तीन महिने या योजनेत महिलांना आर्थिक लाभ देण्यात आली. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर राज्य पातळीवरून लाडक्या बहिणी योजनेत पात्र असणार्‍या महिलांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

यासाठी सरकार पातळीवरून पहिल्या टप्प्यात परिवहन विभागाकडे नोंदणी असणार्‍या चार चाकी वाहन नावावर असणार्‍या महिलांची माहिती घेण्यात येत आहे. सरकार पातळीवरून मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील 20 ते 22 हजार महिलांची यादी महिला बालकल्याण विभागाकडे पडताळीसाठी पाठवण्यात आली होती.या यादीनूसार पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील दीड हजार महिलांच्या नावे चारचाकी वाहन असून त्यांची माहिती आता सरकारला पाठवण्यात येणार आहे. सरकार पातळीवरून या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ सुरू ठेवायचा की बंद करावयाचा याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...