spot_img
ब्रेकिंगशिक्षकच भक्षक ठरले! मुलीवर सामूहिक बलात्कार, कुठे घडली घटना?

शिक्षकच भक्षक ठरले! मुलीवर सामूहिक बलात्कार, कुठे घडली घटना?

spot_img

Crime News: गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. एका सरकारी शाळेत तीन शिक्षकांनी १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केला. मुलगी शाळेत का आली नाही? हे पाहण्यासाठी हेडमास्तर घरी पोहचल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हेडमास्तरांनी त्याच दिवशी तात्काळ पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. आणखी कोणत्या मुलीसोबत असा प्रकार घडलाय का? याचा शोध घेतला जात आहे.

१३ वर्षीय मुलीसोबत एका शिक्षाकाने आधी दुष्कर्म केले. त्यानंतर इतर दोन सहकारी शिक्षकांना याबाबत सांगितले. त्यानंतर त्या तीन जणांनी पुन्हा त्या १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या धक्कादायक घटनेनंतर शाळेचा प्रश्न ऐरणीवर आलाय, पालकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांकडून या प्रकारणाचा तपास सुरू आहे.

लोकांच्या तीव्र संतापानंतर पोलिसांकडून तामिळनाडूमधील कृष्णगिरी जिल्ह्यातील सरकारी शाळेतील तिन्ही नराधम शिक्षकाचा कसून शोध घेण्यात आला. आहे. पोलीस पथकाने तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. नागरिकांनी परिसरात आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडित मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सणाला गालबोट! दोन गटात राडा; वाद सोडवणे पोलिसाला भोवले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - बिहारच्या मुंगेरमध्ये दोन गटाचा वाद सोडवायला गेलेल्या सहायक पोलीस...

१ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, काय आहेत नियम

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्र शासनाने फास्टॅगसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता १ एप्रिलपासून प्रत्येक...

कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ! हायकोर्टात याचिका..

Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात...

शिवसेना खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीशी: काळे

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत चारावाटप अहिल्यानगर । नगर...