spot_img
महाराष्ट्रMaharashtra Project: पाणबुडी प्रकल्प गेला नाही, रखडला? पर्यटन विभागाचा 'असा' प्रताप

Maharashtra Project: पाणबुडी प्रकल्प गेला नाही, रखडला? पर्यटन विभागाचा ‘असा’ प्रताप

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-|
सरकारी उदासीनता, पर्यटन विभागातील लालफितीचा कारभार, राज्य सरकार पातळीवर अपुरा पाठपुरावा यामुळे राज्याचा पाणबुडी प्रकल्प रखडला आहे. २०१८ मध्ये या प्रकल्पाची घोषणा होऊन २०१९ मध्ये दोनवेळा निघालेली निविदा वाया गेली व पुढे हा प्रकल्प आकारास आला नाही.

वेंगुर्ल्याच्या समुद्राखाली अनेक लहान-मोठी बेटे असून ती समुद्राच्या पाण्याखाली गेली आहेत. या बेटांचे दर्शन पर्यटकांना घडविण्यासाठी आकर्षक अशा पाणबुडी प्रकल्पाची आखणी २०१८ मध्ये राज्याच्या पर्यटन विभागाने केली होती. २०१९ च्या सुरुवातीला यासाठी निविदादेखील निघाली. मात्र त्यानंतर हा प्रकल्प पुढेच गेला नाही. नोव्हेंबर २०१९ नंतर नवीन सरकारच्या काळात अडीच वर्षे कोकणच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले गेले.

याबाबत संबंधितांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये तत्कालीन युती सरकारच्या काळातील या निविदेला प्रतिसाद आला नाही. माझगाव डॉकनेही यामध्ये रस दाखवला नाही. त्यानंतर दुसर्‍यांदा निविदा काढण्यात आली. मात्र त्या निविदेला प्रतिसाद मिळण्याआधीच पर्यटन विभागाने प्रकल्पाची फाइल नस्तीबंद’ केली. विविध शंका निर्माण करीत पर्यटन विभागातील अधिकार्‍यांनी हा प्रकल्प थंडबस्त्यात टाकला. नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळीही हा प्रकल्प पुढे गेला नाही. त्यासाठी आवश्यक पावले उचलली गेली नाहीत.

पर्यटकांना समुद्राखाली ३०० मीटरपर्यंत नेण्यासाठी गुजरात सरकारने माझगाव डॉकशी अशी पाणबुडी तयार करण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. मात्र हा करार अत्याधिक प्राथमिक स्तराचा असल्याचे माझगाव डॉकमधील सूत्रांचे म्हणणे आहे. माझगाव डॉकने आजवर नौदलासाठी सरासरी १६०० टन वजनी पाणबुड्या तयार केल्या आहेत. त्या तुलनेत गुजरात सरकारला हवी असलेली पाणबुडी फक्त ५८ टन वजनी असेल.

अशी पाणबुडी तयार करणार का, अशी विचारणा गुजरात सरकारने माझगाव डॉककडे केली होती. त्याला कंपनीकडून होकार येताच सामंजस्य करार झाला आहे. पर्यटकांसाठीची पाणबुडी हा नौदल पाणबुडीपेक्षा वेगळा विषय आहे. तंत्रज्ञान तेच असले तरीही स्वतंत्र पाणबुडी असेल. त्यादृष्टीने हा करार प्राथमिक स्वरूपाचा आहे, असे माझगाव डॉकमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

‘माझगाव डॉक’ एकमेव कंपनी
माझगाव डॉकसारख्या संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्या संरक्षणासंबंधी निश्चित कक्षेबाहेर सहसा काम करीत नाहीत. त्यामुळे पर्यटकांसाठी पाणबुडीची निविदा काढल्यानंतर राज्य सरकारने संरक्षण मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुराव्याची गरज होती. तो केला असता तर निविदेला प्रतिसाद मिळाला असता, असे संबंधितांचे म्हणणे आहे. देशात पाणबुड्या तयार करणारी माझगाव डॉक ही एकमेव कंपनी आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...