spot_img
ब्रेकिंगरस्त्यावर मिमिक्री करणारा बनला बॉलिवूडचा राजा! जॉनी लीव्हर यांचा आज वाढदिवस; जाणून...

रस्त्यावर मिमिक्री करणारा बनला बॉलिवूडचा राजा! जॉनी लीव्हर यांचा आज वाढदिवस; जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
देशातील आघाडीचे विनोदी अभिनेते आणि भारतातील पहिले स्टँड-अप कॉमेडियन म्हणून ओळखले जाणारे जॉनी लीव्हर आज (१४ ऑगस्ट) आपला ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. १४ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशातील एका गरीब ख्रिश्चन कुटुंबात जॉन प्रकाश राव जानुमाला यांचा जन्म झाला. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण फक्त सातवीपर्यंतच घेता आले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी लहानसहान कामं केली. रस्त्यावर पेन विकताना मिमिक्री करत त्यांनी स्वतःतील हास्यकला उलगडायला सुरुवात केली. त्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये नोकरी करत असताना, सहकाऱ्यांसमोर चित्रपटातील कलाकारांची नक्कल करायचे. याच काळात त्यांना ‘जॉनी लीव्हर’ हे नाव मिळालं, जे नंतर त्यांच्या ओळखीचं पर्यायच बनलं.

स्टेज शोज दरम्यान अभिनेते सुनील दत्त यांनी त्यांची कला ओळखली आणि त्यांना ‘दर्द का रिश्ता’ या चित्रपटात पहिली संधी दिली. त्यानंतर जॉनी लीव्हर यांनी मागे वळून पाहिलं नाही. १९९२ ते २००० या कालावधीत त्यांनी सलग आठ वर्षांत १२० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. म्हणजे महिन्याला एकाहून अधिक चित्रपट! ‘खिलाडी’, ‘बाजीगर’, ‘करण अर्जुन’, ‘जित’, ‘जुदाई’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं.

सध्या जॉनी लीव्हर यांची एकूण संपत्ती सुमारे २२४ कोटी रुपये आहे. त्यांची कमाई प्रामुख्याने चित्रपट, जाहिराती, आणि जगभरातील लाईव्ह शो मधून होते. ते दरवर्षी सुमारे १२ कोटी रुपये कमावतात. मुंबईतील ३ बीएचके फ्लॅट, आलिशान व्हिला, रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आणि जवळपास १ कोटी रुपये किंमतीची Audi Q7 ही कार त्यांच्याकडे आहे. इतकी संपत्ती असूनही त्यांचा साधेपणा आणि विनोदी स्वभाव कायम आहे. आजही जॉनी लीव्हर चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. लवकरच ते ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘लंतरानी’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहेत. २०२३ मध्ये देखील त्यांच्या दोन चित्रपटांचा प्रेक्षकांनी आनंद घेतला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धर्माच्या नावाखाली… ; घुलेवाडी येथील घटनेवर बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?

संगमनेर / नगर सह्याद्री घुलेवाडी सप्ताह जे घडले ते तालुक्यातील जनतेने समजून घेतले पाहिजे....

दारू पिण्याची शर्यत बेतली जीवावर; एकाचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री - सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे रविवारी (१७ ऑगस्ट) घडलेल्या...

नगरमध्ये देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला सापळा

कृष्णा लॉजवर छापा | तिघांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरातील बुरुडगाव रोडवरील कृष्णा लॉजवर कोतवाली...

पारनेरमध्ये बिबट्याचा हैदोस, कुठे घडला प्रकार पहा

निघोज | नगर सह्याद्री बिबट्याचा निघोज, गुणोरे, गाडिलगाव, कुंड, खंडोबा पाऊतके परिसरात हैदोस सुरू असून...