मुंबई । नगर सहयाद्री:-
पहिल्या भागाच्या यशानंतर ‘धर्मवीर २’ची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. ‘धर्मवीर’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर २०२२ मध्ये राज्याच्या राजकारणात झालेले उलथापालथ अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. आता ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हे ब्रीद वाक्य घेऊन ‘धर्मवीर २’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता धर्मवीर २-साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार आहे.
बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणारा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर २ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. धर्मवीर २ चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक या अभिनेत्याने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या राजकीय प्रवासासह त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू या चित्रपटातून उलगडले आहेत.
प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितिज दाते, तसेच स्नेहर तरडे, आनंद इंगळे, सुनिल तावडे यासारखी तगडी मराठमोळी स्टारकास्ट या सिनेमात दिसत आहे. या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर तुफान यश आलं असून आता घरी बसून हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळणार आहे. धर्मवीर २ ची गोष्ट २५ ऑक्टोबरपासून zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.