spot_img
अहमदनगरतुफान आलंया..! जनसेवा फाउंडेशनच्या कार्यक्रमास तुफान गर्दी, विखे-कर्डीले यांच्या जोडीचा गाण्यावर...

तुफान आलंया..! जनसेवा फाउंडेशनच्या कार्यक्रमास तुफान गर्दी, विखे-कर्डीले यांच्या जोडीचा गाण्यावर भन्नाट ठेका

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
नगर तालुयातील नवनागापूर येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने काल (दि.११) आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्तपणे दर्शविलेल्या सहभागाने परिसर फुलून गेला होता. यावेळी महिलांची भव्य गर्दी झाली होती. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अजय-अतुल यांच्या झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी ठेका धरत उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमास महिलांनी तुफान गर्दी केली होती.

या कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुजय विखेंनी या सर्व महिलांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दिग्गज संगीतकार व अजय अतुल या जोडीने उपस्थित महिलांना आपल्या गाण्यावर ताल धरण्यात भाग पाडले. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मानसी नाईक यांनी आपल्या नृत्याने उपस्थितांचा उत्साह वाढविला. या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्याच्या अनुषंगाने आयोजित या कार्यक्रमांव्यतिरिक्त भव्य लकी ड्रॉ स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देखील देण्यात आली. या कार्यक्रमात महिला संघटन करणार्‍या अरुणा नानाभाऊ कांबळे, सामाजिक कार्यकर्ता डॉ. अर्चना नांगरे आघाव, ह.भ.प. उज्वला ठोंबरे, मुख्याध्यापिका तारका रंगनाथ भापकर, शिवव्याख्याता प्रणाली कडूस, डॉ. निवेदिता माने, अंगणवाडी सेविका विद्या दुसुंगे, श्रुतिका धनंजय दळवी, शिक्षिका सविता मधुकर बोरकर, अनिता आदिनाथ बनकर, सामाजिक कार्यकर्त्या सिंधू राजेंद्र वाणी, सोनाली योगेश गहिले, स्मिता मंगेश करडे, सुमन साहेबराव सप्रे, मिराबाई ज्ञानदेव शेळके, अश्विनी कोळपकर, मीना बेरड, मीना गणेश काटे, सोनुबाई विजय शेवाळे, कोमल वाकळे, प्रणाली बाबासाहेब कडुस आदी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...