Crime News: गेल्या महिन्याभरात अल्पवयीन मुलीवर आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दररोज नवे नाव, महिला-मुलींना छळण्याचा नवा प्रकार. जनक्षोभ, मोर्चे, निदर्शने, मुलींच्या पालकांना, कुटुंबांना पडलेला एकच प्रश्न, हे थांबणार कधी? अशातच आता नात्याला काळिमा फारसणारी घटना जालन्यामध्ये घडली आहे.
बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटनेमुळे जालन्यामध्ये खळबळ उडाली आहे. २०१८ पासून आरोपी आपल्या मुलीवर वारंवार बलात्कार करत होता. कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देत होता. याप्रकरणी जालन्यातील मौजपुरी पोलिस ठाण्यात बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या नराधम बापाने २०१८ पासून स्वतःच्याच मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बलात्कार केला. मुलीला धमक्या देत आरोपी तिच्यावर बलात्कार करत होता.
जालना पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर भोजपुरी पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीने मुलीवर २०१८, २०२२, २०२३ आणि २०२५ मध्ये बलात्कार केल्याची माहिती मुलीने पोलिसांना तक्रार देताना दिली.