spot_img
ब्रेकिंगमफलर आडवा टाकून काड्या टाकणारा तिकडे बसला!  जरांगे पाटलांनी पुन्हा साधला भुजबळांवर...

मफलर आडवा टाकून काड्या टाकणारा तिकडे बसला!  जरांगे पाटलांनी पुन्हा साधला भुजबळांवर निशाणा

spot_img

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: लक्ष्मण हाकेंना आम्ही विरोधक मानत नाही. त्यांनी त्यांचं आंदोलन करावं. मी धनगर बांधव, एकाही ओबीसी बांधवांना बोललो नाही. आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही. पुढेही मानणार नाही. मफलर आडवा टाकून काड्या टाकणारा तिकडे बसला आहे. काडी टाकून देतो आणि बघतो मजा. आमचा त्यांच्यावर रोष नाही. तुमचा आमचा काही संबंध नाही असं ओबीसी समाजाला माझं सांगणं आहे. असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले, मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्ही आमचं हक्काचे आरक्षण मागतो आहे ते आम्हाला द्या. सगे सोयरे आरक्षण देऊन ते उडवण्याचा सरकारचा डाव आहे आणि ते उडवलं जातं आहे. सरकार आरक्षण देणार आणि तेच आरक्षण देणार आहे.

आरक्षण देण्याच्या आधीच याचिका दाखल झाली होती. पुन्हा मराठ्यांना गोड बोलून डाव साधण्याचा हा डाव आहे. आरक्षण ओबीसीतून घेणार अन्यथा २८८ उभे करू नाहीतर २८८ जणांना पाडू. मराठ्यांचं आरक्षण टिकू न देण्याची तयारी गिरीश महाजन यांनी केली आहे.

ज्याला मराठा राहायचं आहे तो मराठा म्हणून राहिल, कुणबी प्रमाणपत्र हवं असेल तर ते प्रमाणपत्र ते घेईल. हैदराबादचं गॅझेट लागू करा. सगळा अभ्यास वगैरे करुन जर म्हणत असतील की आरक्षण टिकणार नाही तर हा डाव आहे. असं असेल तर सरसकट आरक्षण द्या. मी जिवंत आहे तोपर्यंत ओबीसीतूनच आरक्षण घेणार. असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...