spot_img
अहमदनगरवडिलांचा खून करणारा मुलगा चार दिवसांनी गवसला! 'असा' लावला होता सापळा, एकदा...

वडिलांचा खून करणारा मुलगा चार दिवसांनी गवसला! ‘असा’ लावला होता सापळा, एकदा पहाच..

spot_img

राहाता । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील कोर्‍हाळे गावामध्ये दि. 24 जून रोजी पोटच्या पोराने वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. शेतजमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून वडिल गणपत संभाजी कोळगे यांची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा अनिल कोळगे फरार झाला होता. फरार आरोपी अनिल गणपत कोळगे याला शुक्रवार दि 28 जून रोजी पोलिसांनी जेरबंद केले.

अधिक माहिती अशी: सदर गुन्ह्यातील फरार आरोपी अनिल गणपत कोळगे हा गुन्हा केल्यापासून फरार होता. शुक्रवार 28 जून रोजी सकाळी 10 वाजे दरम्यान आरोपी हा अस्तगाव फाटा येथे येणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाचे पोलीस विनोद गंभीरे यांना मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक सोपान काकड यांना दिली.

पोलीस निरीक्षक काकड तात्काळ गुप्तचर विभागाचे पोलीस गंभीरे व शिंदे यांना सदर ठिकाणी पाठवले. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपी पकडण्यासाठी सापळा लावला. एक व्यक्ती पायी चालत आल्याचे पोलिसांना दिसले.

पोलिसांनी त्यास हटकताच तो पळू लागल्याने पोलीस पथकाने त्याला तात्काळ ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...