spot_img
अहमदनगरदारूच्या नशेत पोलिस कर्मचाऱ्यांचे 'धक्कादायक' कृत्य! अहमदनगरच्या 'त्या' हॉटेलमध्ये नेमकं घडलं काय?...

दारूच्या नशेत पोलिस कर्मचाऱ्यांचे ‘धक्कादायक’ कृत्य! अहमदनगरच्या ‘त्या’ हॉटेलमध्ये नेमकं घडलं काय? पहा, व्हायरल व्हिडिओ

spot_img

श्रीगोंदा| नगर सहयाद्री-
शहरातील काष्टी रस्त्यावरील हॉटेल वैष्णवी येथे दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी हॉटेल मालक संजय शेंडगे आणि त्यांच्या मुलाला ज्ञानेश्वर शेंडगे यांना दारूच्या नशेत बेदम मारहाण केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

२७ जून रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास, श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी फलके आणि गावडे यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून काऊंटरवर असलेल्या हॉटेल चालकांचा मुलगा ज्ञानेश्वर शेंडगे याला अर्वाच्च शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. हॉटेल मालक संजय शेंडगे यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, फलके यांनी त्यांनाही बेदम मारहाण केली. यावेळी शेंडगे यांच्या तोंडाला मोठ्या प्रमाणात मार लागला व ते जखमी झाले.

हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला, ज्यामुळे घटना स्पष्ट झाली आहे. या घटनेनंतर शेंडगे यांनी पोलिस कर्मचारी फलके आणि गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तालुक्यातील एका बड्या नेत्याच्या आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या दबावामुळे गुन्हा दाखल करण्यास अडथळा निर्माण झाला.

या प्रकरणात त्वरित कारवाई होऊन संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, जेणेकरून न्याय मिळू शकेल आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, अशी मागणी हॉटेल चालकांच्या वतीने केली जात आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, १४०० जणांच्या हत्याप्रकरणात दोषी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना...

नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगर पंचायतीसाठी १० नोव्हेंबर पासून...

जेऊर टोलनाक्यावर राडा; पाठलाग करून तरुणावर सपासप वार

राळेगणसिद्धीच्या तिघांवर गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शहरालगत असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेऊर...

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...