spot_img
ब्रेकिंगस्वयंघोषित कालिचरण महाराज विचित्र प्राणी; जरांगे पाटलांचे खोचक शब्दात प्रत्युत्तर

स्वयंघोषित कालिचरण महाराज विचित्र प्राणी; जरांगे पाटलांचे खोचक शब्दात प्रत्युत्तर

spot_img

Manoj Jarange Patil on Kalicharan Maharaj: बाबाला काही गरज नव्हती. आरक्षण आणि बाबांचा काय संबंध येतो. या बाबाने बरच सांगितलं. बाबांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे, हे त्यांचं काम आहे. आरक्षण काय हे शिकवण त्यांचं काम नाही. स्वयंघोषित कालिचरण महाराज विचित्र प्राणी, माझ्या आई बहिणीवर हल्ला झाला तेव्हा तू कुठे गेला होता? हा टिकल्या, गंध लावतो, नथ घालतो अशा शब्दात कालिचरण महाराज यांनी केलेलया विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रविवार दि. १७ रोजी रविवार दि. १७ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे कालीचरण महाराज यांची धार्मिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आक्रमक भाषेत लक्ष्य केले होते. नुकतेच एक आंदोलन सुरु झालं होतं माहिती आहे ना, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं.

कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखो लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्याने थडग्यावर चादर चढवली. यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस असल्याचे म्हणत कालिचरण महाराज यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती. त्यांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जरांगे पाटील म्हणाले, हिंदू धर्मावर ज्यावेळी संकट येतं. तेव्हा आम्ही समोर येतो. तुला मी कधी बोललो नाही. तू वर आणि खाली वेगळा दिसतो. तुला कधी मी बोललो नाही. बाबा तुला आमचं दुःख कळायचं नाही. तुम्ही पाकिटं घेऊन किर्तनं करता, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. गरिबांच्या घरात जाऊन बस आणि आरक्षण कशाला लागतं ते विचार, हिंदूत अर्धा एकटा मराठा आहे. तू सुपारी घेतली असेल.

आम्ही छत्रपतीच हिंदुत्व चालवतो तू कोणतं हिंदुत्व चालवतो. तू आतून काही घालतो की नाही हे लोकांना माहीत नाही. तुला काय अक्कल आहे का रे? कालीचरण हा सपाट दिसतो वरून खालपर्यंत… सरकारने हे असले संत कुठून प्रचाराला आणलेत. हिंदू असूनही का मराठ्यांच्या पोराला मारायला निघालेत? तुला मराठ्यांचा तिरस्कार का आहे? पक्षाला बदनाम करण्यासाठी तू आम्हाला बदनाम करतो का?, असं म्हणत जरांगे यांनी कालीचरण महाराज यांच्यावर निशाणा साधला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...