spot_img
महाराष्ट्रसमंदर लौट कर आ गया! देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री? विधीमंडळ पक्षनेतेपदी...

समंदर लौट कर आ गया! देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री? विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतील स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मागील काही दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर आज झालेल्या महायुतीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कोअर कमिटीतील सर्व नेत्यांनी मंजुरी दिली आहे. फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.

बुधवारी विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये आपलं पहिलं भाषण केलं. या भाषणात त्यांनी त्यांच्यासोबत महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आणि सर्व आमदारांचे, जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी एक है तो सेफ है चा देखील नारा दिला. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानतो. ज्या प्रक्रियेनं आपण निवडून येतो, त्या संविधानाची 75 वर्षं पूर्ण होतायत म्हणून हे महत्वाचं आहे. माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा पंतप्रधान मोदींनी बसवलं. अर्थात एकदा 72 तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्‌‍या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसण्याचा मान दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचेही आभार मानतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गुरुवारी शपथविधी
05 नोव्हेंबर 2024 रोजी आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे. या सोहळ्यात भगवा रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. सोहळ्यासाठी तीन वेगवेगळे स्टेज उभारण्यात आले आहेत. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह केंद्रातील मंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

शपथविधी सोहळ्याला पद्मश्री पवारांना निमंत्रण
राज्यातील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. 5 डिसेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. पद्मश्री पोपटराव पवार या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...