Maharashtra Crime: राज्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख सुरुच आहे. राज्यात प्रसिद्ध असलेल्या बारामतीमध्ये काही दिवसांपूर्वीच एका शाळेतील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. सदरच्या प्रकरणात दोघींना दारु पाजून चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले होते. आता पुन्हा बारामतीमधील एका शाळेत भयंकर घटना घडली आहे.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी सदरचा प्रकार उघडकीस आला. हा खून कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. मात्र, या विद्यार्थ्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांचा मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. बारामतीच्या विद्यालयामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.