spot_img
अहमदनगरसामान्यांच्या प्रगतीत सहकारी बँकांची भूमिका मोलाची; सुमनताई शेळके

सामान्यांच्या प्रगतीत सहकारी बँकांची भूमिका मोलाची; सुमनताई शेळके

spot_img

जीएस महानगर को-ऑप. बँकेचा पुणे, सातारा, अहिल्यानगरमध्ये शाखा विस्तार
पारनेर । नगर सहयाद्री:-
सर्वसामान्य माणसांच्या प्रगतीमध्ये सहकारी बँकांची भूमिका खूप मोलाची आहे. भविष्यात ग्राहकांना उत्तमोत्तम अणि अद्ययावत सेवा प्रदान करुन पाच हजार कोटींचा एकूण व्यवसायाचा टप्पा पार पाडण्याचा जीएस महानगर को ऑप. बँकेचा मानस असल्याचे प्रतिपादन बँकेच्या अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांनी केले.

सहकार क्षेत्रात अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाच्या जीएस महानगर बँकेच्या तीन नवीन शाखांचा उद्घाटन समारंभ दि. 27 मार्च, 2025 रोजी उत्साहात संपन्न झाला. या तीन शाखा पुणे येथील फुरसुंगी, साताऱ्यातील मलकापूर आणि अहिल्यानगर मधील सुपा येथे एटीएम सुविधेसहित सुरु करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बँकेच्या संचालक मंडळा बरोबर सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होत्या.

या तीन नवीन शाखांमुळे जीएस महानगर बँकेच्या एकूण शाखांची संख्या 70 झाली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय हा 4,500 कोटींच्या वर असून 2023-24 या गत आर्थिक वर्षात बँकेचा निव्वळ नफा 30.00 कोटी होता. त्याच बरोबर शून्य टक्के नेट एनपीए चे उद्दिष्ट साध्य करण्यात बँक यशस्वी झाली आहे. रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या सर्व अर्थिक निकषांची बँकेने पूर्तता केल्यामुळे आर्थिक दृष्ट्‌‍या सक्षम व सुव्यवस्थित बँकेचा दर्जा (एफएसडब्लूएम) प्राप्त झाला आहे.
आतापर्यंतची बँकेची प्रगती ही बँकेच्या सर्व भागधारक, ग्राहक, हितचिंतक आणि कर्मचारी वर्ग यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच शक्य झाली आहे असेही याप्रसंगी अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांनी मनागेतात सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...