spot_img
अहमदनगरमहसूलवाल्यांना राजकारण्यांची दलाली भोवली! 'यांची' उचलबांगडी, नेमकं प्रकरण काय?

महसूलवाल्यांना राजकारण्यांची दलाली भोवली! ‘यांची’ उचलबांगडी, नेमकं प्रकरण काय?

spot_img

पारनेर तहसीलमधील मंडळाधिकारी, तलाठ्यांसह अव्वल कारकुनांची आयुक्तांकडून उचलबांगडी | विभागीय चौकशीचेही बालंट
पारनेर | नगर सह्याद्री
वाळू तस्कारांशी थेट संबंध, हप्तेखोरीत अव्वल, दप्तरदीरंगाईत पटाईत, तरीही अनेक वर्षे तालुक्यात राजकीय वरदहस्ताने ठाण मांडून राहिलेल्या पारनेर तहसील कार्यालयाशी निगडीत काही कर्मचार्‍यांवर नाशिक विभागाच्या आयुक्तांनी बदली आदेशाचा कारवाईचा बडगा उगारला. बदलीच्या जोडीने या सर्व कर्मचार्‍यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्यावर या अहवालानंतर कारवाई होणार असल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बदली करण्यात आलेले बहुतांशजण हे अनेक वर्षांपासून तालुक्यात ठाण मांडून होते आणि हे सर्वजण तालुक्यातील नामांकीत लोकप्रतिनिधीच्या इशार्‍यावर त्या नेत्याच्या विरोधात भूमिका घेणार्‍या स्थानिक नागरिकांना त्रास देण्याचे काम करत असल्याच्या तक्रारीही होत्याच!

याबाबतची अधिक माहिती अशी की, पारनेर तहसील कार्यालय आणि या कार्यालयास हाताशी धरुन सामान्य नागरिकांसह अनेकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत होते. शासनाची नोकरी करताना जनतेची सेवा करण्याचे आणि त्यांची कामे मार्गी लावण्याचे सोडून तहसील कार्यालयाशी संबंधित काहीजण हे राजकारण्यांचे हस्तक झाले होते. त्यातून त्या राजकारण्याच्या इशार्‍यावर जिरवाजिरवी करण्याचे कंत्राटच यातील काही कर्मचार्‍यांनी मिळवले होते. गावागावातील जे लोक त्यांच्याशी निगडीत पुढार्‍याच्या विरोधात तालुक्याच्या राजकारणात भूमिका घेताना दिसायचे, त्यांना वेठीस धरण्याचे आणि त्यांची कामे अडवून ठेवण्याचे कंत्राट हे कर्मचारी पार पाडत होते.

शासनाची नोकरी करत असतानाही राजकारण्यांचे कंत्राट घेतलेल्या या कर्मचार्‍यांबाबत थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्यासह जिल्हाधिकारी, महसूल विभागाचे नाशिक विभागीय आयुक्त, महसूल सचिव यांच्याकडे तक्रारीही झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेताना विभागीय आयुक्तांनी याबाबत सविस्तर अहवाल मागवला. याशिवाय या कर्मचार्‍यांबाबत समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून आलेल्या अहवालानुसार यातील अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या आणि स्थानिक राजकारण्यांच्या हातचे बाहुले झालेल्या काही वादग्रस्त कर्मचार्‍यांवर बदलीेची कारवाई केली. बदली करण्यात आलेल्या काही कर्मचार्‍यांची लागलीच विभागीय चौकशी करण्याचे आणि त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले. या विभागीय चौकशीत अनेक गंभीर प्रकार समोर येणार असून याबाबत नागरिकांनी महसूल आयुक्तांसह जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याबाबत थेट जिल्हाधिकार्‍यांना भेटून काही ग्रामस्थ सविस्तर निवेदन देणार आहेत.

वाळूतस्करांचे ‘कलेक्शन’ं रडारवर!
तालुक्याच्या हद्दीतून जाणार्‍या मुळा नदी पात्रातून आणि विशेषत: पळशी, वनकुटा, नागापुरवाडी, मांडवा या गावांमधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा चालू आहे. हा अनधिकृत उपसा थांबविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी अनेकदा आदेश दिले. मात्र, आदेश जाताच हप्त्याचा आकडा वाढवून घेत ही तस्करी आणखी सुसाट सुटायची! पळशी सर्कल आणि टाकळी सर्कल यांच्या संयुक्त विभागात ही तस्करी जोरात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने हे सारे होत असून आम्हाला त्यांना देखील वाटा द्यावा लागतो असे जाहीर सांगितले जायचे. याबाबत तक्रारीही झाल्या! त्या तक्रारींची सुनावणी देखील आता सुरू झाली आहे. टाकळी ढोकेश्वर येथील एका चौकात वाळू तस्करांचे कलेक्शन होऊन त्याची वाटणी करण्याची जबाबदारी पार पाडणार्‍या मंडळाधिकार्‍यावरच बदली आणि विभागीय चौकशी अशी दुहेरी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

कुणकुण लागताच वीटभट्टी अन् वाळू तस्करांकडून मोठी वसुली!
महसूली नोंदीसह अनेक कामे प्रलंबीत ठेवून चुकीची कारणे देत खरेदीखताच्या नोंदी रद्द करणे, विविध कामे प्रलंबीत ठेवणे आणि नागरिकांशी उद्धटपणे वागणे, दमदाटी करणे अशा मोठ्या प्रमाणात तक्रारींचा पाऊस टाकळी ढोकेश्वर येथील मंडळाधिकार्‍याच्या बाबत झाल्या होत्या. याबाबत थेट नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे तक्रारी झाल्या. त्या तक्रारींची दखल घेतल्याचे आणि आपली बदली होणार असल्याचे कुणकुण लागताच या मंडळाधिकार्‍याने टाकळी आणि पळशी सर्कलमधील वीटभट्टी चालक, वाळू तस्कर यांच्यावर कारवाईचे नाटक केले. यासाठी काही तलाठ्यांना हाताशी धरले. कारवाई टाळण्यासाठी पाच- पाच आकडी रक्कम वसुल करण्यात आली. त्यातून मोठा मलिदा या टीमने जाता- जाता जमा केल्याची माहिती समोर आली असून याची तक्रार देखील आता विभागीय आयुक्तांकडे काही ग्रामस्थांनी केली आहे.

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...