spot_img
ब्रेकिंगरक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलचे संतापजनक कृत्य; लिफ्टमध्ये थांबवून मुलीचा हात धरला,...

रक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलचे संतापजनक कृत्य; लिफ्टमध्ये थांबवून मुलीचा हात धरला, ओढत नेले अन्…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
मुंबईतील सात रस्ता परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना शनिवारी (१२ जुलै २०२५) घडली.

मिळालेल्या महितीनुसार, पीडित मुलगी प्रसाद घेण्यासाठी इमारतीतून बाहेर पडली असता आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. पीडिताने लिफ्टमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने तिला थांबवले आणि तिचा हात धरला. त्यानंतर तिला जिन्यावरून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ओढत नेले. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. पीडिताच्या आईने ताबडतोब आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात फिर्याद दिली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम ७४, कलम ७८ आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी ताडदेव येथे सशस्त्र पोलिस दलात कार्यरत आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात मोठे मंत्री हनी ट्रॅपमध्ये, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणाने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात...

भयंकर! शॉपिंग मॉलला भीषण आग, 60 जणांचा मृत्यू; अनेक जण जिवंत जळाले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - इराकमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग लागली. या आगीमध्ये लहान...

संदीप थोरात आणखी गोत्यात; ठेवीदारांचा आक्रमक पवित्रा, पत्रकार परिषदेत मोठी माहिती उजेडात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री क्लासिक ब्रीज, मनीमॅक्सच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्यानंतर सह्याद्री मल्टीसिटी निधी लि....

डांगे आयुक्त आहेत की भ्रष्टाचाऱ्यांचे प्रवक्ते?; किरण काळे यांचा सवाल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मनपातील 776 रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे 350 ते 400 कोटींच्या महाघोटाळ्याच्या...