spot_img
अहमदनगरअर्थसंकल्पातील 'तो' कर लावण्याचा प्रस्ताव अन्यायकारक ; आमदार तांबेंनी सरकारला धरले धारेवर

अर्थसंकल्पातील ‘तो’ कर लावण्याचा प्रस्ताव अन्यायकारक ; आमदार तांबेंनी सरकारला धरले धारेवर

spot_img

संगमनेर। नगर सहयाद्री:-
जगभरासह देशात ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक कारची मागणी वेग धरू लागली असताना महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक गाड्यांच्या मागणीला ब्रक लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समोर येत आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ टक्के मोटार वाहन कर लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या निर्णयाला आमदार सत्यजीत तांबे यांनी जोरदार विरोध केला असून, हा कर अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे.

आ. तांबे यांनी विधीमंडळात सरकारला प्रश्न विचारला की, देशातील इतर कोणत्याच राज्यात इलेक्ट्रिक वाहनांवर कर नाही, मग महाराष्ट्रातच का? तसेच, केंद्र सरकार प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे, अशा स्थितीत महाराष्ट्र सरकारने कर लावणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला विरोध करण्यासारखे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांवर कोणताही कर लावलेला नव्हता. मात्र, नव्या निर्णयामुळे ही वाहने ६ टक्क्यांनी महाग होणार आहेत. महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल उद्योग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे, त्यामुळे या निर्णयाचा उद्योगावरही परिणाम होईल, असे आ. तांबे यांनी सांगितले. तसेच, राज्यात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सुविधा अपुरी आहे. केवळ मुंबई महापालिकेने पार्किंगमध्ये चार्जिंग पॉइंट सक्तीचे केले असले तरी इतर ठिकाणी चार्जिंग स्टेशन नाहीत. अशा परिस्थितीत सरकार या करातून चार्जिंग सुविधांचा विकास करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सभापती राम शिंदेंनी विकासासाठी कंबर कसली; ‘या’ रस्त्यासाठी १० कोटी मंजुर

जामखेड । नगर सहयाद्री:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी गावाचा देशातील प्रमुख...

शहर हादरलं! गरम डोक्याच्या सुनेने सासूला कायमचं थंड केल…

Maharashtra Crime: महाराष्ट्रातील जालना शहरातून कौटुंबिक वादातून घडलेल्या एका अत्यंत क्रूर हत्येच्या घटनेने खळबळ...

सरपंच पुत्र लाच-लुचपतच्या जाळ्यात; बुरुडगाव रोडला ‘असा’ लावला सापळा…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील वाळुंज येथील सरपंच पुत्राला लाच स्विकारताना  लाच-लुचपतच्या विभागाच्या...

नगरमधील ‘या’ पतसंस्थेत मोठा अपहार, १२ संचालकावर गुन्हा दाखल

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल 79...