spot_img
अहमदनगरप्रचाराच्या तोफा थंडावल्या; जिल्ह्यात 'यांनी' गावजल्या सभा

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; जिल्ह्यात ‘यांनी’ गावजल्या सभा

spot_img

बुधवारी मतदान | जिल्ह्यात दुरंगी-तिरंगी लढती
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. जिल्ह्यातील १२ ही मतदारसंघात तुल्यबळ लढत होत आहेत. काही ठिकाणी बहुरंगी लढती होत असल्याचे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात चुरस वाढली आहे. दिवाळीनंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोपांचे फटाके फुटले. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी टोकाला पोहोचलेला प्रचार आताथंडावला आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सामना रंगला आहे. याशिवाय काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, मनसे यांच्यामुळे लढत बहुरंगी झाली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी अपक्ष आणि बंडखोरांचंही तगडं आव्हान आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसात दिवाळीनंतर राजकीय नेत्यांनी जिल्ह्याच्या रणसंग्रामात राजकीय फटाके फोडत विरोधकांवर तोफा डागल्या. यंदा माध्यमांसह सोशल मीडियावर प्रचाराचा जोर दिसून आला. रविवारी जिल्ह्यात प्रचाराचा सुपर संडे दिसून आला. यात पदयात्रा, कॉर्नरसभा व जेवणावळीला ऊत आल्याचे चित्र चोहीकडे होते. नगर जिल्ह्यात विधानसभेच्या १२ जागा असून याठिकाणी महायुती की महाविकास आघाडी सर्वाधिक जागा घेणार यावर राज्याचे सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे.

जिल्ह्यातील काही मतदारसंघात अपक्ष चमत्कार घडवणार असून काही ठिकाणी हे अपक्ष कोणाला दणका देत घराचा रस्ता दाखवणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल घोषित होतील. यंदाच्या निवडणुकीत कोणता पक्ष सत्तेत येणार, कोणाच्या पदरात मुख्यमंत्री पद पडणार, हे पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत. यात नगर जिल्ह्याचा किती वाटा राहणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. निवडणूक यंत्रणा, जिल्हा प्रशासन मतदान घेण्यासाठी सज्ज झाली आहे. मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळ, मतदान यंत्रणा, बंदोबस्त विविध पथके, प्रमुख शहरात सुरू असणारी नाकेबंदी यामाध्यमातून निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणूका पारपडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

जिल्ह्यात यांनी गावजल्या सभा
भाजपच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. रावसाहेब दानवे, ठाकरे गटाच्यावतीने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खा. संजय राऊत, काँग्रेसच्यावतीने प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, शिवसेना शिंदे गटाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनजंय मुंडे, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यासह धर्मजागरण सभेचे कालिचरण महाराज, तसेच अन्य नेत्यांच्या सभा जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत झाल्या. यावेळी त्यांनी केलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगली राजकीय जुगलबंदी पहावयास मिळाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरमध्ये खळबळ! मतपेट्या आणलेल्या बसमध्ये सापडले नोटांचे बंडल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी...

उमेदवारांची धाकधूक वाढली! नगरमध्ये कुणाच्या अंगावर पडणार गुलाल…

विधानसभेच्या परिक्षेचा शनिवारी निकाल | समर्थकांकडून गुलालाची तयारी | चौकाचौकात दावे प्रतिदावे अहिल्यानगर | नगर...

भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात; संगमनेरमध्ये झळकले फ्लेक्स

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून आता वेध लागलेत ते निकालाचे....

शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला; कुठे घडली घटना

छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री:- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील एका 31 वषय महिलेवर...