spot_img
अहमदनगर'जी एस महानगर' बॅंकेची सत्ता योग्य व्यक्तीच्या हातात!, गीतांजलीताई शेळके यांचा मुंबईत...

‘जी एस महानगर’ बॅंकेची सत्ता योग्य व्यक्तीच्या हातात!, गीतांजलीताई शेळके यांचा मुंबईत सत्कार

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री
जी एस महानगर बॅंकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मुंबानगरीत फार मोठा आधार मिळाला असून या बॅंकेची सत्ता योग्य व्यक्तीच्या हाती आली असल्याचे समाधान मुंबई येथील पारनेर तालुक्यातील स्थायीक जनतेला असल्याचे मत ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब आहेर यांनी व्यक्त केले आहे. जी एस महानगर बॅंकेच्या चेअरमन गीतांजली ताई शेळके यांचा मुंबई येथील पारनेर तालुका युवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी गणपत वाफारे, भाऊ गोडसे, अरविंद वाढवणे, शशिकांत गाडगे, तुकाराम कदम, जालिंदर खोसे, महादू गाडगे, दादाभाऊ रेपाळे, अनिल शेळके, उद्धव वाफारे,शुभम आहेर आदी उपस्थित होते. आहेर सर म्हणाले, गेली दोन वर्षात जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब व माजी अध्यक्ष उदयजी शेळके यांच्या विचारांचे अनुकरण न करता बॅंकेच्या कारभारात हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू होता.

याचा फटका अधिकारी, कर्मचारी व बॅंकेच्या कारभारात भरीव योगदान देणाऱ्या आजी माजी संचालक, आजी माजी पदाधिकारी यांना मोठ्या प्रमाणात बसला. जी एस महानगर बॅंकेच्या चेअरमन गीतांजली ताई शेळके यांनी गेली दोन वर्षात जिल्हा सहकारी बँक असो की जी एस महानगर बॅंकेच्या माध्यमातून सहकार चळवळीत काम करताना बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके व माजी अध्यक्ष उदय शेळके साहेब यांच्या विचाराचे अनुकरण केले याची जाणीव सभासदांना झाली म्हणून संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब पॅनलच्या सर्वेसर्वा गीतांजली ताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ दहा हजार मतांच्या फरकाने निवडून आले. पाच हजार कोटींचा टप्पा व शंभर शाखा लवकरच होतील अशी खात्री आहेर सर यांनी व्यक्त केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निघोज येथील ‘अन्नत्याग आंदोलन’ आश्वासनानंतर स्थगित; आ दाते नेमकं काय म्हणाले? वाचा..

कांदा भाववाढीसाठी सरकार सकारात्मक; निर्यातबंदी लवकरच उठेल आ. काशिनाथ दाते । निघोज येथील अन्नत्याग आंदोलन...

अहिल्यानगरमध्ये राडा! १५ जणांच्या टोळक्याचा तरुणावर गँगस्टर हल्ला; सीसीटीव्हीत प्रकार झाला कैद!, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात जुन्या कोर्ट प्रकरणातील वैरातून अन्सार रहीम...

पत्नीचा कुर्‍हाडीने घेतला जीव! भल्या पहाटेच शहरात भयंकर प्रकार..

संगमनेर | नगर सहयाद्री :- तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा...

माणिकराव कोकाटे यांना ‘धक्का’!; राज्याला मिळाले नवे कृषीमंत्री, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सहयाद्री राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अखेर फेरबदल झाला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे...