Maharashtra politics: माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या तीन महत्वाच्या योजना आता बंद होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध न केल्यामुळे, या योजनांवर संकट आले आहे. या योजनांमध्ये ‘आनंदाचा शिधा’, ‘१० रुपयांची शिवभोजन थाळी’, आणि ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना’ यांचा समावेश आहे.
शिंदे सरकारने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनांचा शुभारंभ केला होता. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर महायुती सरकारने या योजनांचा आढावा घेतला आणि राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून या योजनांचा भविष्य उज्जवल दिसत नाही. विशेषत: ‘आनंदाचा शिधा’ योजना, जी प्रमुख सणांच्या वेळी लागू केली जात होती (जसे की दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा, आणि शिवजयंती), यंदा त्यासाठी निधी प्राप्त झालेला नाही.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली ‘१० रुपयांची शिवभोजन थाळी’ योजना एकनाथ शिंदे सरकारने चालू ठेवली होती. परंतु, या योजनेसाठीही निधी मिळालेला नाही, ज्यामुळे राज्यभरातील शिवभोजन केंद्रे बंद पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना’ देखील बंद होण्याच्या मार्गावर आहे, कारण अर्थसंकल्पात यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.
दरम्यान, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’, ‘महिलांसाठी एसटी प्रवासात ५०% सवलत’, आणि ‘शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना’ हीं योजनेचे चालू राहण्याचे संकेत आहेत, कारण या योजनांसाठी सरकारने निधी मंजूर केला आहे. शिंदे सरकारच्या योजनांना निधी न मिळाल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती सरकार यांच्यात कडवट आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.