spot_img
अहमदनगरराजकीय वातावरण पुन्हा तापलं! आचारसंहितेचा भंग? खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह ५० जणांवर...

राजकीय वातावरण पुन्हा तापलं! आचारसंहितेचा भंग? खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री-
संगमनेरमध्ये विखे आणि थोरात यांच्यातील वादाचा दोन दिवसापूर्वीच भडका उडाला होता. धांदरफळ येथील सभेत जयश्री थोरात यांच्याबद्दल वसंत देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वाद चिघळला होता. तसेच संगमेनरमध्ये जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली होती. आता याप्रकरणी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह ५० जणांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

धांदरफळ येथील विखेंच्या सभेतून महिलांचा अवमान झाल्याचा आरोप करत थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्याचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटले. काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करत जाळपोळ केल्याची माहिती देखील समोर आली होती. तसेच जयश्री थोरात यांच्यसह समर्थकांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात यावा, या मागणीसाठी संगमनेर पोलीस स्टेशनसमोर रात्रभर ठिय्या आंदोलन केले होते.

आता याप्रकरणी आचारसंहिता भंग करत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जयश्री थोरात जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा संगमनेरमधील राजकीय वातावरण आणखी पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...