spot_img
अहमदनगरAhmednagar News: मजूर महिलांना घेऊन जाणारा पिकअप पोहचलाच नाही? वाटेतच घडलं असं...

Ahmednagar News: मजूर महिलांना घेऊन जाणारा पिकअप पोहचलाच नाही? वाटेतच घडलं असं काही, महिलांनी हंबरडाच फोडला..

spot_img

कोपरगाव । नगर सहयाद्री-
तालुक्यातील कोळपेवाडी येथील महिला मजुरांना घरी सोडण्यासाठी येणारा पिकअप शिर्डी- नाशिक महामार्गावर वावी परिसरात गोडगे पब्लिक स्कूल समोर उलटल्याने यातील एक महिला व एक पुरुष ठार झाले तर १८ महिला व ड्रायव्हर सह दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून एक महिला अत्यवस्थ आहे. या पिकअप मध्ये महिला पुरुष अशा एकूण २१ व्यक्ती होत्या.

अधिक माहिती अशी: कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, मळेगाव व येवला तालुक्यातील काही मोलमजुरी करणाऱ्या महिला व पुरुष एनएच १६० या राष्ट्रीय महामार्गाच्या लगतचे छोटे मोठे गवत काढण्याचे व साफसफाई करण्याचे कामासाठी कोळपेवाडी बरून बावी येथे नियमितपणे जाते. त्यासाठी कोळपेवाडी बरून आपली वाहने वावी या ठिकाणी ठेवून तेथून पिकअप वाहनातून पुढे कामासाठी जात होते व संध्याकाळी पुन्हा या सर्व मजुरांना बाबी येथे त्यांच्या वाहनाजवळ ठेकेदाराकडून सोडण्यात येत असे.

त्याप्रमाणे बुधवार दिनांक १९ रोजी आपल्या कामाची सुट्टी झाल्यानंतर या मजुरांना कोळपेवाडी येथे जाण्यासाठी बाबी येथे सोडविण्यासाठी निघालेला पिकअप एमएच १४ डीएम १४५४ हा वावी जवळील गोडगे पब्लिक स्कूल समोर सायंकाळी सव्वा सहा ते साडे सहाच्या सुमारास उलटला. त्यामुळे या वाहनातील महिला व पुरुष मजूर रस्त्यावर फेकले गेले. यापैकी एक महिला गंभीर जखमी होऊन जागेवरच मयत झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच एक पुरुष देखील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना मयत झाला आहे.

दुसरी एक महिला देखीलअत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे. इतर महिला व दोन पुरुषांना सिनर व नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर जखमी महिलांनी हंबरडा फोडला होता. वेळेत रुग्णवाहिका दाखल झाल्यामुळे जखमींना वेळेत रुणालयात दाखल करण्यात आले. जखमी महिलांमध्ये काही महिला या साठ वर्षे वयापेक्षा जास्त असल्याची माहिती हाती आली असून राष्ट्रीय महामार्गाचे स्वच्छतेचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने या मजूर महिलांचा अपघात विमा काढला आहे किंवा नाही याचाबत माहिती मिळू शकली नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...