spot_img
अहमदनगरपाऊले चालती पंढरीची वाट…! संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे गुरुवारी श्रीरामपूरात आगमन..

पाऊले चालती पंढरीची वाट…! संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे गुरुवारी श्रीरामपूरात आगमन..

spot_img

Sant Nivruttinath Maharaj Palkhi: गुण गाईन आवडी, माझे पंढरीचे आई, काय महिमा वर्णावा किती, विठुरायाच्या नगरी’, विठोबा रखुमाई… जय जय विठोबा रखुमाई…अशा भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी मार्गक्रमण करत आहे. संत निवृत्तीनाथांची पालखी नगर जिल्ह्यात असून लोणी परिसरात दाखल झाली आहे.

गुरुवार दि.१८ जून रोजी पालखी श्रीरामपूरकडे प्रस्थान करणार आहे. विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, तरीही अभंगांच्या गोडीनं अन् विठ्ठलाच्या ओढीनं एक एक पाऊल पंढरीच्या दिशेनं टाकत आहेत. हजारो-लाखो वारकऱ्यांची पायी वारी सुरू आहे. १० जून रोजी पालखी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा आठवा दिवस आहे.

ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते आहे, त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत. लांबवरून दिसणारी दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना होत आहेत.

संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचा 26 दिवसांचा प्रवास
देहू आणि आळंदी येथील दिंड्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या दिंडीचा तिसरा क्रमांक लागतो. त्र्यंबक येथील निवृत्तीनाथ समाधी स्थळाहून निघणारी ही दिंडी 26 दिवसांचा प्रवास करते. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यातून पालखीचा प्रवास असणार आहे.

रथाला चांदीची कलाकुसर
रथ हा शिसवी लाकडाचा असून त्यावर 230 किलो चांदीच्या पत्र्यावर कलाकुसर करून घडवला आहे. यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च आलाय. सात वर्षाआधी हा रथ साकारण्यात आलाय. हा खर्च वारकरी भक्तांनी केला आहे. सजवलेल्या या पालखीत नाथांची चांदीची प्रतिमा आणि पादुका ठेवून पंढरपूरकडं प्रस्थान झाले आहे.

हरित वारी उपक्रम
हरित वारी उपक्रमांतर्गत प्रत्येक मुक्काम स्थळी आणि दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी पाच झाडांची रोपे ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत. या वृक्षांची लागवड आणि देखभाल ग्रामपंचायती करणार असून, वनविभाग आणि वैयक्तिक देणगीदारांच्या सहकार्याने एक लाख रोपांची तजवीज करण्यात आली आहे. तसंच पालखी प्रस्थानाच्यावेळी फोटो काढण्यासाठी होणारी गर्दी आणि त्यामुळं होणारा उशीर टाळण्यासाठी यावर्षी संस्थानने सहा वारकरी सेवेकऱ्यांना अधिकृत ओळखपत्र दिलं आहे. हे सेवेकरी पारंपरिक पोशाखात राहून पालखी उचलणे, रस्ता मोकळा करणे आणि शिस्त राखणे यासाठी मदत करतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! पुण्यात प्रसिद्ध प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; बाथरूममध्ये केला लैंगिक अत्याचार?

Ashish Kapoor : मनोरंजन विश्वात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता...

नगर-मनमाड महामार्गावर अपघात; अहिल्यानगरचे सेवानिवृत्त शिक्षक ठार

Accident News: नगर-मनमाड महामार्गावर लागोपाठ दोन दिवसांत तीन अपघात झाले आहे. काल सायंकाळी साडेसात...

सरकारी कामात मिळणार यश, प्रगतीची संधी; आर्थिक लाभ वाचा, आजचे राशि भविष्य..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे - तुमच्या मनावर...

मराठा आरक्षणाचा GR फाडला, OBC नेते आक्रमक, आता राज्यव्यापी आंदोलन

पुणे / नगर सह्याद्री - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर...