spot_img
राजकारणशिंदे-जरांगेंमधील कराराने २ बळी घेतले, एक भाजप व दुसरा म्हणजे...प्रकाश आंबेडकरांचा मोठा...

शिंदे-जरांगेंमधील कराराने २ बळी घेतले, एक भाजप व दुसरा म्हणजे…प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आले. मुंबईत घुसण्यापूर्वीच जरांगे यांच्या मागण्या मान्य करत शिंदे सरकारने पुढील काही गोष्टी घडण्याच्या टाळल्या.

राठा आंदोलनातून यशस्वी मार्ग काढल्यामुळे एकनाथ शिंदेंचं कौतुक होत असताना सत्ताधारी महायुतीतीलच काही नेत्यांच्या विरोधाचाही त्यांना सामना करावा लागत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी या आपली भूमिका मांडत खळबळजनक दावा केलाय.

ते म्हणाले आहेत की, “मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कराराने दोन बळी घेतले आहेत असं मी मानतो. एक बळी भाजपचा गेला आहे आणि दुसरा जे सरंजामी पुढारी होते, ज्यांनी भूमिका घेतल्या नाहीत, ते आता बोल्ड आऊट झाले आहेत,” असा दावा त्यांनी केलाय.

आंबेडकर म्हणाले की, “एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात जो समझोता झाला. त्या समझोत्यामुळे ओबीसींचा असा समज झाला आहे की, भाजपने आम्हाला फसवलं आहे. धर्माचा प्रचार करून आमची मत त्यांनी घेतली. पण, आमचे रक्षण भाजपने केले नाही. म्हणून, ओबीसी पूर्णपणे भाजपपासून तुटलेला आहे,” असं मत प्रकाश आंबेडकरांनी मांडलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम ‘या’ दिवशी जाहीर होणार?

माय नगर वेब टीम Zilla Parishad Panchayat Samiti Election : येत्या २ डिसेंबर २०२५...

बीड पुन्हा हादरलं; ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं

बीड / नगर सह्याद्री - बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, नेमकं काय केल?

नगर सह्याद्री वेब टीम Sonakshi Sinha : बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज अभिनय,...

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...