अहमदनगर | नगर सह्याद्री
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेले महामोर्चाचे नगरमध्ये मोठ्या जल्लोषाने स्वागत करण्यात आले. एक मराठा! लाख मराठा!!, देख लो आखो से..! मराठे आऐ लाखोसे! अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुला गेला होता.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेला मोर्चा रविवारी (दि. २१) अहमदनगर जवळील बाराबाभळी (ता. नगर) येथे आला. रात्रीचा मुक्काम बाराबाभळी येथे होता. २२ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आला. जरांगे पाटील यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
आज सकाळ पासुनच मराठा बांधवांचे नगर शहरामध्ये आगमन होत आहे. मराठा आरक्षण पदयात्राचे स्वागत करण्यात येत असून ठिकठिकाणी सकाळच्या नाष्टयाची, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.महामोर्चामध्ये लाखोच्या संख्येने युवक उपिस्थत होते.
आ. जगतापांनी धरला ठेका
लाखोंच्या मराठा बांधवांसह मनोज जरांगे शहरात दाखल होताच आ. संग्राम जगताप मोर्चात सहभागी झाले. त्यांनी मनोज जरांगे यांचा पुष्पहार घालून स्वागत केले. आमदार जगताप मोर्चात सहभागी होताच तरुणांनी त्यांना उचलून घेत नृत्य केले. त्यांनीही डीजेच्या ठेयावर नृत्य केले. त्यानंतर रॅली पुढे येताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आ. जगताप व मनोज जरांगे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.