spot_img
अहमदनगरनवीन आर्थिक वर्षात नगरकरांच्या खिशाला कात्री; पाणी पट्टीबाबत महापालिकेने केले स्पष्ट

नवीन आर्थिक वर्षात नगरकरांच्या खिशाला कात्री; पाणी पट्टीबाबत महापालिकेने केले स्पष्ट

spot_img

 

पाणीपट्टीच्या नवीन मागणीसह थकबाकीसाठी अंदाजपत्रकात तरतूद / नवीन आर्थिक वर्षापासून नवीन दराने पाणीपट्टीची आकारणी होणार / अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्पष्टीकरण

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
महानगरपालिकेच्या पाणीपट्टीच्या दरात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार वाढ करण्यात आली आहे. येत्या नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल पासून ही नवीन वाढ लागू होऊन त्यानुसार पाणीपट्टी आकारण्यात आली आहे. अंदाजपत्रकात चालू आर्थिक वर्षाची मागणी व जुनी थकबाकी अशी एकत्रित तरतूद जमा बाजूत करावी लागते. मागील वर्षीही ती करण्यात आली होती व याही वर्षी करण्यात आली असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

संपूर्ण आर्थिक वर्षात वसूल होणाऱ्या पाणीपट्टीसाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जाते. यात थकबाकीची रक्कमही गृहीत धरावी लागते. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात चालू दराने म्हणजेच घरगुती पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यापूर्वी १३ कोटी ९५ लाख ६५ हजार चालू वर्षाची मागणी व थकबाकीपैकी वसूल होणारी रक्कम अशी एकूण ३० कोटींची तरतूद जमा बाजूमध्ये करण्यात आली होती. येत्या आर्थिक वर्षापासून पाणीपट्टीच्या दरात वाढ होणार असल्याने नवीन आर्थिक वर्षात चालू मागणी ६ कोटी १४ लाख ४६ हजार ६०० रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात चालू मागणी २० कोटी १० लाख ११ हजार ६०० रुपये इतकी होत आहे. व मागील थकीत रक्कमेपैकी सुमारे १० कोटी रुपये वसुली अपेक्षित धरून अंदाजपत्रकात एकत्रित अंदाजे ३० कोटी रुपयांची तरतूद जमा बाजूत करण्यात आली आहे.

अंदाजपत्रकात मागील वर्षी व नवीन वर्षासाठी ३० कोटींची तरतूद असली तरी, त्यात थकबाकी व चालू मागणी असा दोन्ही बाबींचा समावेश आहे. त्यामुळे पाणीपट्टी वाढीबाबत कोणताही गैरसमज करून घेण्याची गरज नाही. तसेच, सदर तरतूद ही अंदाजे असते. चालू वर्षासह थकीत पाणीपट्टीची तरतुदीपेक्षा अधिक वसुली झाल्यास तरतूद वाढवता येईल, पाणीपट्टी वाढीबाबत कोणताही संभ्रम नसून नव्या दरानुसार आकारणी होणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! वाल्मिक अण्णा कराडवर हल्ला; कारागृहात काय घडलं?

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या आणि खंडणीप्रकरणी मकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर बीड...

भाजपच्या ‘बड्या’ नेत्याला धक्का; एकुलत्या एक मुलीने जीवन संपवलं

Today News: राजकीय वर्तुळातून अलीकडच्या काळात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना, आता एक...

महाराष्ट्रात अवकाळी संकट! या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट; कुठे कसं हवामान?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. एकीकडे काही जिल्ह्यात तापमानाने...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार! नगर जिल्ह्यातील ‘या’ महिला ठरणार अपात्र?, कारण आलं समोर..

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे....