spot_img
अहमदनगरIndorikar Maharaj News:'विचारांची दहीहंडी' काळाची गरज; अहमदनगरच्या किर्तन सोहळ्यात इंदोरिकर महाराज नेमकं...

Indorikar Maharaj News:’विचारांची दहीहंडी’ काळाची गरज; अहमदनगरच्या किर्तन सोहळ्यात इंदोरिकर महाराज नेमकं काय म्हणाले?

spot_img

श्रीगोंदा। नगर सहयाद्री
सध्या दहीहंडीची व्याख्या बदलली आहे, परंतु घनश्याम शेलार यांनी आयोजित केलेली विचारांची हंडी ही कोट्यावधी रुपये खर्च करून साजर्‍या होणार्‍या दही हंडीपेक्षा कितीतरी पटीने भारी आहे, आणि आज अश्याचप्रकारे दहीहंडी उत्सव साजरा होणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले. घनश्याम शेलार मित्र मंडळाच्या वतीने श्रीगोंदे शहरात आयोजित करण्यात आलेल्या विचारांची हंडी या कार्यक्रमात कीर्तन करताना इंदोरीकर महाराज बोलत होते.

यावेळी त्यांनी आपल्या खुमासदार विनोदी शैलीतून समाजातील अनेक चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकत लोकांना समाधानी राहण्याचा आणि मुलांवर संस्कार करण्याचा मौलिक सल्ला देखील दिला. तसेच नेत्यांनी आपल्या गावातील शाळांकडे लक्ष द्या शाळा सुधारल्या तर उद्याची पिढी चांगली तयार होईल हीच खरी गोकुळाष्टमी असे सांगत चारित्र्याला डाग लागु देऊ नका,व्यसनापासून लांब रहा, अंगातील ताकद,खिशातील पैसा आणि आपल्याजवळील वेळ जपून वापरण्याचा मौलिक सल्ला देतानाच महाराजांनी आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजनही घातले. तसेच मानवता हा एकमेव धर्म असून त्याचे सर्वांनी पालन केले पाहिजे, संपत्ती टिकवायची असेल तर संतती चांगली पाहिजे माणसाने समाधानी राहिले पाहीजे आणि समाधानी राहाण्यासाठी भजन करणे हाच पर्याय असल्याचे महाराजांनी सांगितले.

टाळ्या, हश्या, अश्रु आणि प्रतिसाद
इंदोरीकर महाराजांनी आपल्या खास विनोदी शैलीतून समाजात चालू असलेल्या चुकीच्या गैरप्रकारांवर टीका करत लोकांना पोट धरून हसायला लावले तर त्याचवेळी मुलगी पळून गेल्यावर आई वडिलांची होणारी परिस्थिती ,व्यसनामुळे कमी वयात मरण पावणारे मुले आणि जन्मदात्या आई वडिलांचा संभाळ न करणारी मुलं तसेच नुसत्या कविता करून बाप समजतं नसतो त्यासाठी बापाच काळीज असावं लागत असे भावनिक होऊन सांगताच उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रु दरवळले. वारकरी सांप्रदायाची तुलना कोणत्याच क्षेत्राशी होऊ शकत नाही. जगात सर्वात श्रीमंत माणूस हा वारकरी असून तो ज्ञानोबा रायांचा प्रसाद असल्याचे सांगताच टाळ्यांचा कडकडाट देखील झाला.

पुस्तकांची हंडी फोडून वाचनालयाला भेट
काल झालेल्या कार्यक्रमात इंदोरीकर महाराज यांच्याहस्ते वेगवेगळी पुस्तके असलेली हंडी फोडण्यात आली. त्यानंतर त्यातील पुस्तके वाचनालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच शहरातील गाडे कुटुंबाला वैद्यकीय उपचारांसाठी लागणारी आर्थिक मदत सुद्धा यावेळी सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पुरुषांसह महिलांनी गर्दी केली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...