spot_img
अहमदनगरमोटार सायकल चोरणा-या अट्टल गुन्हेगाराच्या नगर तालूका पोलीसांनी आवळल्या मुसक्या; तब्बल 'इतक्या'...

मोटार सायकल चोरणा-या अट्टल गुन्हेगाराच्या नगर तालूका पोलीसांनी आवळल्या मुसक्या; तब्बल ‘इतक्या’ दुचाकी केल्या जप्त

spot_img

 

अहमदनगर / नगर सह्याद्री –

गर्दीच्या ठिकाणावरून मोटार सायकल चोरणा-या अट्टल गुन्हेगाराच्या नगर तालूका पोलीसांनी आवळल्या मुसक्या आवळल्या आहेत. अहमदनगर व पुणे जिल्ह्यामधून लग्न, सभा, मंदीरचे बाहेरून अशा गर्दीच्या ठिकाणावरून तो मोटार सायकलच्या चो-या करायचा. त्याला पकडण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे.

दि.15 जुलै 2024 रोजी गणेश मंगल कार्यालय, नगर, दौंड रोड, हिवरे झरे ता.जि. अहमदनगर येथून तुकाराम बबन शिंदे (वय 47 वर्षे धंदा शेती रा. शिंदेवाडी, अरणगाव ता. नगर जि. अहमदनगर) यांची होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल ही चोरीला गेले बाबत दि.16/07/2024 रोजी नगर तालूका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोहेका राहुल राजेंद्र द्वारके हे करीत होते.

नगर तालूका पोलीस स्टेशनचे सपोनि. प्रल्हाद गिते यांना गोपनिय माहातीदारा मार्फत खात्रीलायक माहीती मिळाली कि, नगर तालूका पोलीस स्टेशन गुर नं 591/2024 मधील मोटार सायकल ही किशोर जयसिंग पटारे (रा. वडगाव गुप्ता ता.जि. अहमदनगर) याने केली असून तो सध्या स्टेट बँक ऑफ इंडीया चौक, अहमदनगर येथे येत असल्याची खात्रीलायक माहीत माहीती समजल्याने नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफ यांना सदर ठिकाणी जावून आरोपी मजकुर यास ताब्यात घेऊन कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने नगर तालूका पोलीस स्टेशन चे अंमलदार यांनी स्टेट बँक ऑफ इंडीया येथे सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले. त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव किशोर जयसिंग पटारे (वय 40 रा. महादेव मदीर जवळ, पिंपळगाव माळवी ता. नगर जि. अहमदनगर हल्ली रा.द्वारका मंगल कार्यालय जवळ, वडगाव गुप्ता ता. नगर जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगीतले. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने नगर तालूका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच अहमदनगर तसेच पुणे जिल्ह्यामधून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. सदरच्या चोरी केलेल्या मोटार सायकली ह्या माझ्या नातेवाईक व मित्र यांचे कडे लपून ठेवल्या आहेत अशी कबुली दिल्याने आरोपीने सांगीतलेल्या ठिकाणी जावून एकून 21 मोटार सायकली ताब्यात घेतल्या तसा सविस्तर पंचनामा दोन पंचाच्या समक्ष करून मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

सदर गुन्ह्यातील आरोपी किशोर जयसिंग पटारे (वय 40 रा. महादेव मदीर जवळ, पिंपळगाव माळवी ता.नगर जि. अहमदनगर हल्ली रा.द्वारका मंगल कार्यालय जवळ, वडगाव गुप्ता ता. नगर जि. अहमदनगर) याचेवर विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संपत भोसले, सपोनी प्रल्हाद गिते यांचे मार्गदर्शनाखाली सफौ / दत्तात्रय हिंगडे, पोहेकाँ/शाहीद शेख, पोहेकाँ/राहुल द्वारके, पोहेकाँ/नितीन शिंदे, पोहेकाँ/राहुल थोरात, पोकाँ/संभाजी बोराडे, पोकाँ/राजु खेडकर, पोकाँ/सागर मिसाळ सर्व नेम. नगर तालूका पोलीस स्टेशन तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकाँ/राहुल गुंडू यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...

बापरे! महापालिकेत ६० कोटींचा भ्रष्टाचार? ‘कोणी आणि का केली मागणी?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या...

खा. नीलेश लंके यांना भाजपची ‘मोलाची साथ’; राणीताई लंके यांचा विधानसभेचा मार्ग सुकर होणार

पारनेरला राज्य शासनाचा कोट्यवधींचा निधी | आ. टिळेकर धावले मदतीला | राणीताई लंके यांचा...