spot_img
अहमदनगरशहरातील प्रसिद्ध रीलस्टारची हत्या; सुसाईड नोटमध्ये 'धक्कादायक' मजकूर

शहरातील प्रसिद्ध रीलस्टारची हत्या; सुसाईड नोटमध्ये ‘धक्कादायक’ मजकूर

spot_img

Reelstar Murder जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका माजी सैनिकाने आपल्या रीलस्टार मुलाची हत्या करून नंतर आत्महत्या केली. मुलाच्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. विठ्ठल पाटील यांचा मृतदेह गुरुवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

पोलिसांना त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये त्यांनी मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. तसेच मुलाचा मृतदेह कुठे आहे, याची माहितीही त्यांनी चिठ्ठीत दिली होती. मुलगा दारू पिऊन छळ करत असल्याने आपण त्याला संपवल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले.विठ्ठल पाटील हे मूळचे एरंडोल तालुक्यातील भवरखेड येथील रहिवासी होते, परंतु ते एरंडोल येथील वृंदावन नगर परिसरात कुटुंबासह राहत होते.

त्यांचा मुलगा हितेश हा रीलस्टार होता आणि सोशल मीडियावर विविध विषयांवर रील्स बनवायचा. तो वडिलांपासून वेगळा राहत होता. हितेशला दारूचे व्यसन होते आणि दारू प्यायल्यानंतर तो अनेकदा वडिलांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करत असे, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...