spot_img
ब्रेकिंगलग्नघरी दुखाचा डोंगर कोसळला! आई-वडिलांनी संपवल जीवन?, कारण काय?

लग्नघरी दुखाचा डोंगर कोसळला! आई-वडिलांनी संपवल जीवन?, कारण काय?

spot_img

Maharashtra News Today: दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील झाडाला गळफास घेत एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या पाठोपाठ आता नाशिकमध्ये आणखी एक आत्महत्येची घटना घडली आहे. मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी जीवन संपवले. टिळकवाडी भागात शहा दाम्पत्याने विष सेवन करून आत्महत्या केली. त्यामुळे नाशकात खळबळ उडाली. मुलासोबत भोजनानंतर व्यावसायिकाने पत्नीसह आत्महत्या केली. मुलाच्या लग्नाची तयारी घरात सुरू असताना आई-वडिलांच्या आत्महत्येने शहा कुटुंबास धक्का बसलाय. आत्महत्येचे कारण अस्पष्ट, शहा दाम्पत्याचा व्हीसेरा राखून ठेवला. वीस दिवसांवर धाकट्या मुलाचा लग्न सोहळा असताना आई-वडिलांनी आत्महत्येने केलेल्या खळबळ उडाली आहे.

जयेश शहा आणि रक्षा शहा यांनी रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याआधी विष घेतले. त्यामुळे त्यांना रात्री ११ च्या सुमारास गंभीर अवस्थेत सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण त्यांनी प्राण सोडले. शाह यांचा मोठा मुलगा बांधकाम व्यवसायिक आहे, त्यानं रविवारी रात्री आईला फोन केला, पण बोलताना अडथळल्या. त्यामुळे त्याने घरी जाऊन पाहणी केली, ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केला. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहा दाम्पत्यांनी टोकाचा निर्णय का घेतला? याचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी त्यांची खोली तपासली. त्यामध्ये संशयास्पद कोणताही गोष्ट अथवा चिठ्टी आढळली नाही. नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळले. पोलिसांनी कुटुंबातील इतर लोकांची चौकशी केली, पण आत्महत्येचं कारण उघड झालेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर-पुणे महामार्गावरअपघात; चालकासह आठ जण..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर- पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात एसटी बस ट्रेलरवर आदळून...

लाडकी बहिण योजनेवरून कोर्टाचे राज्य सरकारांना खडे बोल

दिल्ली | वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्यात 2024 विधानसभा निवडणुकीपूव लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली...

दूध अनुदान योजना सुरूच ठेवावे; आमदार कर्डिले यांचे दुग्धमंत्र्यांना साकडे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- राज्य सरकारने दुध अनुदान योजना सुरू करून अडचणीत आलेल्या दुध व्यवसायाला...

पुतणीला कपडे घेऊन देण्याचा बहाणा, राहत्या घरात चुलत्याचा भलताच कुटाणा; शहर हादरलं!

Crime News : मुंबईतील चेंबूरमध्ये मनाला हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. चुलत्याने १५...