spot_img
अहमदनगर'राज्यमंत्री मंडळाची बैठक 'या' तारखेला अहिल्यानगरमध्ये भरणार'; जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जाणार?

‘राज्यमंत्री मंडळाची बैठक ‘या’ तारखेला अहिल्यानगरमध्ये भरणार’; जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जाणार?

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मे महिन्याच्या अखेरीस येत असून देशभरातून लोक चौंडीत येत असतात. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्यकर्तृत्व सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी व योग्य नियोजन करण्यासाठी फडणवीस सरकारने चौंडीत २९ एप्रिल रोजी कॅबिनेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

31 मे, 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती येत असून त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे संपूर्ण देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करेल, त्यांचे असामान्य कार्यकर्तृत्व सर्वांपर्यंत पोहचेल अशा श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. यानिमित्ताने राज्य मंत्रिमंडळाची बैठकही इथे होणार आहे.

चौंडी विकास प्रकल्पाचा सुधारित विकास प्रकल्प आराखडा बनवण्यात येत असून त्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न एकत्रितपणे मांडणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना विविध विभागांचे प्रस्ताव एकत्रित करण्याची सूचना केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती महोत्सव वर्षानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक दि. २९ एप्रिलला चौंडी येथे होणार आहे. या बैठकीपुढे जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जाणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खडीमाफिया दत्तात्रय शेळके म्हणतो, कलेक्टर अन्‌‍ पोलीस माझ्या खिशात!

अकोले तहसीलदारांनी वहिवाट रस्ता मंजूर केला, बेलापूरच्या खडी क्रशरवाल्याने उखडून टाकला! 10 लाख खर्चून तयार...

‘सिस्पे’, साकळाई योजनेबद्दल विखे पाटलांचे मोठे विधान, जनतेच्या पैशाची जबाबदारी ‘त्या’ लोकप्रतिनिधीची

पद्मश्रींच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना सन्मान; शेतकरी दिनाच्या घोषणेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. सुजय विखे...

आझाद ठुबे यांच्या राजे शिवाजी पतसंस्थेत 67 कोटींचा घोटाळा

अपहाराशी संबंधित 40 घोटाळेबहाद्दरांसह सहा कर्मचारी दोषी पारनेर | नगर सह्याद्री माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद...

गणेश मंडळांना मिळणार एका क्लिकवर परवानगी; आयुक्त डांगे यांनी दिली माहिती, पहा लिंक..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री गणेशोत्सवात व इतर सण-उत्सव काळात मंडप उभारणी, स्वागत कमानी, रनिंग मंडपसाठी...