spot_img
अहमदनगरनगरला होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुस्तीची लोकप्रियता वाढवेल; मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार...

नगरला होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुस्तीची लोकप्रियता वाढवेल; मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार जगताप म्हणाले…

spot_img

 

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचा मातीपूजन

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
अहिल्यानगरला कुस्तीची वैभवशाली मोठी परंपरा आहे. त्यामुळे येथील मैदानावर ही स्पर्धा होणे हे आनंदाची बाब आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलम्पिक कुस्ती स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यावेळेस कुस्तीला सोन्याचे दिवस होते मात्र आता हे वलय कमी होत आहे. त्यामुळे कुस्तीला पुनर्वैभव प्राप्त व्हावे यासाठीच महाराष्ट्र राज्य कुस्तीकर संघ स्थापन होऊन गेल्या ६७ वर्षापासून प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माध्यमातून देशात नेतृत्व करणारे खेळाडू निर्माण करायचे आहेत. यासाठी ही स्पर्धा चांगली होणे आवश्यक आहे. कुस्तीगिरांचा मनोधैर्य वाढवणारी स्पर्धा आहे. नगरची स्पर्धा कुस्तीची लोकप्रियता वाढवेल असेच यशस्वी नियोजन आ.संग्राम जगताप करतील. यासाठीच नगरला यजमानपद दिले आहे. कुस्तीगिरांना हक्काचे व्यासपीठ देण्याबरोबरच त्यांची प्रतिष्ठाही संघटना वाढत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून कुश्रीगीरांना थेट शासकीय सेवेत घेऊन त्यांचे प्रतिष्ठा वाढवली आहे. त्यामुळे या क्षेत्राला नवी संजीवनी मिळाली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी एक कोटी रुपयांचे शासकीय अनुदान मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहे. कुस्तीप्रेमी मुख्यमंत्री मिळाल्या असल्याने कुस्तीला पुनर्वैभव प्राप्त होईल यात शंका नाही. अहिल्यानगरची ही स्पर्धा सुंदर, लेखणी व नियोजनबद्ध होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर माहोळ यांनी केले.

येत्या २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगर मध्ये होणाऱ्या ६७ व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धेच्या मैद्नानाच्या मातीचे पूजन आज केंद्रीय मंत्री मुरलीधर माहोल यांच्या हस्ते वाडियापार्क येथे उभारण्यात आलेल्या स्व बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी येथे हा मातिपूजन सोहळा शेकडो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, सरचिटणीस हिंद केसरी योगेश दोडके, कार्याध्यक्ष पै. संदिप भोंडवे, माजी आमदार अरुण जगताप आमदार शिवाजी कर्डिले स्पर्धेचे संयोजक आमदार संग्राम जगताप, उपाध्यक्ष पै. अर्जुन शेळके, महाराष्ट्र केसरी पै. अशोक शिर्के, महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे, सचिव प्रा.डॉ.पै.संतोष भुजबळ, सहसचिव पै.प्रविण घुले आदींसह सर्व पदाधिकारी, शहर व जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी यांच्या उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री.मोहोळ म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे. त्यामुळे इथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितपणे मोठी आणि यशस्वी होईल. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारा पैलवान आपल्याकडे झाला नाही. त्यामुळे अशा स्पर्धेतून कुस्तीमध्ये देशाचे नेतृत्व करणारे कुस्तीगीर घडविण्याची गरज आहे. स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन झाल्यास कुस्तीगीरांना प्रेरणा मिळते. अहिल्यानगरमध्ये होणारी स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातल्या मातीतल्या या खेळाला शासनाने भरीव अर्थसहाय्य दिले असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी १ कोटी रुपये देण्याचा आणि महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरींच्या पुरस्कार रकमेतही वाढ करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच्या स्पर्धेच्यावेळी घेतला आहे, असेही ते म्हणाले.

आमदार कर्डिले म्हणाले, कुस्तीमुळे शरीर निरोगी आणि मन शुद्ध रहाते, जीवनात नवी ऊर्जा मिळते. लाल मातीत श्रम करतांना पैलवानांनी चुकीच्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धेच्या निमित्ताने पैलवानांना प्रोत्साहन दिल्यास त्यांना पुढील कारकिर्दीसाठी ऊर्जा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

श्री.तडस म्हणाले, महाराष्ट्रातील कुस्तीगीरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले यश संपादन केले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघातर्फे कुस्तीगीरांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यांनी ऑलिंपिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत चांगले यश मिळावे यासाठी प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीगीरांना राजाश्रय देण्याचे, त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे कार्य केले. कुस्तीच्या विकासासाठी तालुका पातळीवर मॅटची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात स्पर्धेचे संयोजक आमदार संग्राम जगताप म्हणाले, राज्यातील सर्वात मोठ्या कुस्तीचा थरार नगरमध्ये रंगणार आहे याचा आनंद होत आहे. नगरच्या लाल मातीने अनेक मल्ल दिले आहे. या लाल मातीच्या पूजनाला केंद्र मंत्री येणे हे अभिमानास्पद आहे. ही स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी दिशा देणारी व प्रेरणादारी स्पर्धा ठरेल. नगरला यजमानपद दिल्याबद्दल कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संघाचे आभार मानतो. कुस्ती क्षेत्राला बळकटी देण्यासाठीच पुढील काळात काम करणार आहे. यासाठी वाडियापार्क मैदानाचे नूतनीकरण करताना येथे तालीम येथे उभारणार आहोत, से सांगून काही मागण्या मंत्री माहोळ यांच्या कडे केल्या.

संतोष भुजबळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र केसरी, उप महाराष्ट्र केसरी, कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...

ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करणाऱ्या कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज : मंत्री विखे पाटील

निघोज / नगर सह्याद्री ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करीत कन्हैया दूध उद्योग समूहाच्या माध्यमातून...

डॉ. अनिल बोरगे यांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले चुकीचा अर्थ लावून…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर...

पाणी आणणे म्हणजे एमआयडीसीत ठेकेदारी करणे नव्हे; मंत्री विखेंचा खा. लंकेंना सूचक टोला

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खा. लंकेंना टोला | कान्हूर पठार येथे मंत्री विखेंचा...