spot_img
अहमदनगरलोकसभा झाली, आता विधानसभा! निवडणूक आयोगाची मोठी माहिती समोर? वाचा सविस्तर

लोकसभा झाली, आता विधानसभा! निवडणूक आयोगाची मोठी माहिती समोर? वाचा सविस्तर

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणूकीनंतर राज्याला वेध लागले आहे ते विधान सभा निवडणूकीचे. यंदा महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने आता निवडणूक आयोगाने देखील तयारीला सुरूवात केली आहे.

येत्या २५ जूनपासून महाराष्ट्रात पोलींग स्टेशन्स, मतदारांचे समूह यांची चाचपणी केली जाणार आहे. तसेच असेही स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकांची तयारी म्हणून नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत मतदार म्हणून तुमची नोंदणी केली नसेल तर ती तातडीने करुन घ्या असे आवाहन निवडणूक आयोगाने केली आहे. दरम्यान १८ व्या लोकसभेसाठीची निवडणूक पार पडल्यानंतर आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा या ठिकाणी निवडणूक पूर्वतयारी सुरु केली आहे.

हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ ला संपणार आहे. त्यादृष्टीने आता राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यात याव्यात, अशी विनंती निवडणूक आयोगाने राज्यांना केली आहे.४५ प्लसचा दावा करणार्‍या महायुतीला अवघ्या १७ जागांवर यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत.

लोकसभेतल्या या विजयानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. लोकसभेत ज्याप्रमाणे लोकांनी भाजपाला नाकारलं तसंच चित्र विधानसभेतही दिसेल आणि आम्ही १८० ते १८५ जागा जिंकू असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. भाजपाने जी फोडाफोडी केली ती लोकांना म्हणजेच खास करुन मतदानासाठी येणार्‍या मतदारांना भावली नाही हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिलं आहे. आता विधानसभा जिंकायची असेल तर भाजपाची रणनिती नेमकी काय? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आह

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...