सुपा । नगरत सहयाद्री:- 
अनेक दिवसापासून लोणी हवेली परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. दुधाडे मळा व कोल्हे वस्ती येथे बिबट्याचा त्रास सुरू होता. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, विशेषतः रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घाबराट होती.
यावेळी उपसरपंच इंजि. अमोल विक्रम दुधाडे यांच्या प्रयत्नातून आणि अनिकेत दुधाडे, आराध्य दुधाडे, श्रीराज दुधाडे, कार्तिक दुधाडे, अविनाश दुधाडे, ओंकार दुधाडे यांच्या सहकार्याने दोन दिवसांपूर्वी दुधाडे मळा (गुलाब फाटा) येथे पिंजरा लावण्यात आला. या कामात वनविभागाचे अधिकारी शेख साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले. सध्या पावसामुळे शेतकरी दिवस व रात्री विद्युत पुरवठा करत आहेत; अशा परिस्थितीत बिबट्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला होता.
मात्र आता बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी सरपंच जान्हवी दुधाडे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी थोरे, लहू कोल्हे, कमलेश दुधाडे, महेंद्र दुधाडे, महेश सोंडकर, संतोष दुधाडे, स्वप्निल सोंडकर, अनिल सोंडकर, सुनिल दुधाडे (ग्रामसेवक), बाजीराव दुधाडे, सुरज दुधाडे, संकेत दुधाडे, तुळशीराम दुधाडे, दत्ता दुधाडे, मोहन काकडे, कानिफनाथ दुधाडे, किशोर कोल्हे, बाळासाहेब दुधाडे, भाऊसाहेब दुधाडे, संभाजी दुधाडे, आप्पा दुधाडे, बबन दुधाडे (ढाकणे), अनिल (काका) दुधाडे आदी उपस्थित होते.



 
                                    
