spot_img
अहमदनगरAhmednagar News: हृदयद्रावक! बिबट्याने मुलीवर घेतली झेप, पोटचा गोळा गेल्याने आईने फोडला...

Ahmednagar News: हृदयद्रावक! बिबट्याने मुलीवर घेतली झेप, पोटचा गोळा गेल्याने आईने फोडला हंबरडा..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
एक हृदय द्रावक घटना समोर आली आहे. राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे बिबट्याने दोन वर्षाच्या बालिकेवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. वेदिका श्रीकांत ढगे असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. पोटचा गोळा गेल्याने कटूंबावर मोठे दुःख कोसळले आहे.

अधिक माहिती अशी की, गुरुवार (दि. २३) रोजी सकाळी आठच्या सुमारास वेदिका श्रीकांत ढगे ही दोन वर्षीय बालिका अंगणात खेळत होती. जवळच असलेल्या गिन्नी गवतात बिबट्या लपून बसलेला होता. यावेळी बिबट्याने अचानक बालिकेवर हल्ला केल्याने घरातील सर्वांनीच आरडाओरडा केला.

त्यामुळे बिबट्याने बालिकेला सोडून पलायन केले. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात बालिका गंभीरित्या जखमी झाल्याने कुटुंबियांनी व आजूबाजूच्या नागरीकांनी तात्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पंरतु, त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तळहता प्रमाणे जपलेला पोटचा गोळा गेल्याने आईने हंबरडा फोडला तर कटूंबावर मोठे दुःख कोसळले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...