spot_img
महाराष्ट्रसत्तेचा आनंद मिळूच देणार नाही! जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा

सत्तेचा आनंद मिळूच देणार नाही! जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा

spot_img

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास महायुती सरकार सत्तेत येऊनही त्यांना आनंद मिळू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला. जरांगे यांचा मुलगा जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला भेटण्यासाठी जरांगे आले असता जालना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

मराठा समाज जेवढा समजदार तेवढाच आक्रमक आहे. कोणीही आले तरी आरक्षणासाठी लढाई करावी लागणार आहे. आमच्या लेकरांना आम्हाला अधिकारी करायचे आहे. या पुढील उपोषण सरकार स्थापन झाल्यावर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे आहे. नवीन सरकार कोणाचेही येऊ त्यांना शुभेच्छा आहेतच. अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पैसे दिले. आता शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे न मिळाल्यास रूमणे हातात घेऊन नुकसान भरपाई मागणार आहे. मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचीही सत्ता येणार नाही. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास गावागावांतील मराठे या सरकारमधील लोकांना जाब विचारणार आहेत, असे जरांगे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर दाखल; वाहतुकीत मोठा बदल, वाचा अपडेट

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या...

शहरातील लॉजवर प्रेमाचा भयंकर शेवट; बॉयफ्रेंडच्या कृर्त्याने शहर हादरलं

Crime News: एका लॉजवर महिलेची हत्या तिच्याच बॉयफ्रेंडने केली असल्याचे उघड झाले आहे. आरोपीने...

सावध राहा! भांडी स्वच्छ करण्याच्या नावाखाली सोनं पळवलं; नगर मधील धक्कादायक प्रकार ..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर मधील वसंत टेकडी, सावेडी येथे दोन अनोळखी इसमांनी एका 78...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा एका क्लिकवर..

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आर्थिक रूपात...