अहिल्यानगर | नगर सह्याद्री
संसदेत प्रश्न मांडून केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करून मूर्तिकारांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खासदार नीलेश लंके यांनी दिले.
पीओपीमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचे पुरावे मूर्तिकार संघटनेने पुरावे सादर केले असून त्यावर शासनाने बंदी घालण्याचा जो घाट उचलला आहे तो त्वरित थांबवावा. उलट पीओपी हे पर्यावरणास घातक नसून शाडू माती पर्यावरणास सहा पटीने घातक आहे. मानवी शरीरावर त्याचा परिणाम होत असल्याचा दावा अहिल्यानगर जिल्ह्यातील मूर्तिकार संघटनेने केला आहे. शाडू मातीवर त्वरित बंदी घालावी असे आशयाची निवेदन खासदार नीलेश लंके यांना देण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर, वसंत लोढा, संतोष रायपेल्ली, संजय देवगुनी, संदीप सुसरे, नितीन राजापुरे, चंद्रकांत जोरवेकर (संगमनेर), राजू दळवी (राहता), विकास गोरे (राहुरी), तानाजी वाघमोडे (नेवासा), संजय पारखे (पाथर्डी), खंडू चंदन (श्रीगोंदा) आधी सह जिल्हाभरातून २०० मूर्ति कारखानदार उपस्थित होते.
यावेळी खासदार लंके यांनी जिल्ह्यातील सर्व गणेश मूर्ती कारखानदारांशी चर्चा केली. याविषयी संसदेत आवाज उठून केंद्रीय पर्यावरण मंत्री यांच्याशी चर्चा करून मूर्तिकारांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.