spot_img
ब्रेकिंगपावसाचा जोर वाढला ! मुसळधार सरींसह यलो अलर्ट, कुठे बरसणार पाऊस...

पावसाचा जोर वाढला ! मुसळधार सरींसह यलो अलर्ट, कुठे बरसणार पाऊस…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून, राज्यभरात हलक्या ते मध्यम सरींनी नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला आहे. आज (9 ऑगस्ट) पहाटेपासून मुंबईसह अनेक भागांत पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मराठवाडा, विदर्भ आणि कोकणासाठी यलो अलर्ट जारी केला असून, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामानाचा अंदाज काय?
हवामान खात्याच्या माहितीनुसार, फिरोजपूर ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. कर्नाटक आणि बांगलादेश-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांमुळे 13 ऑगस्टपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि कोकण येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

तसेच मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ आणि दमट वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी तर दुपारनंतर किंवा संध्याकाळी पावसाचा जोर वाढू शकतो. मरिन ड्राइव्ह, कुलाबा, दादर, सायन, अंधेरी, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, भांडुप येथे पावसाचा प्रभाव जाणवेल.

सखल भागांत (हिंदमाता, अंधेरी सबवे, बीकेसी) पाणी साचण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे गुरुवार-शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.

मान्सूनचा ‘ब्रेक’ आणि तज्ज्ञांचे मत
हवामान तज्ज्ञांनुसार, ऑगस्टमध्ये ‘ब्रेक-इन-मॉन्सून’मुळे पावसात 10 दिवसांची खंड पडते, ज्यामुळे उकाडा वाढला होता. पुढील चार दिवसांत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे, परंतु कोकण, मराठवाडा आणि विदर्भात 8 ते 15 ऑगस्टपर्यंत पाऊस कायम राहील. तापमान 32-33 अंश सेल्सिअस राहील, तर वर्धा आणि चंद्रपूर येथे 35.5 अंशांपर्यंत कमाल तापमान नोंदवले गेले. पावसामुळे वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे.

शहरासह दक्षिणेत पावसाच्या श्रावण सरी
अहिल्यानगर – तब्बल दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अहिल्यानगर शहरासह दक्षिण जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने १३ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात हलका व मध्यम स्वरुपाचा होईल असा अंदाज वर्तविला आहे. यंदा पावसाळ्यापूर्वीच अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. जून महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला. कमी-अधिक ओलीवर शेतकर्‍यांनी चाड्यावर मूठ धरली आणि खरिपाची पेरणी केली. परंतु पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. आता तब्बल दीड महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने खरिप पिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने शनिवारी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तर १३ ऑगस्टपर्यंत हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला. शुक्रवारी रात्री नगर, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी दुपारी नगर शहरात पावसाने हजेरी लावली. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोन लेकरांसह आईची विहिरीत उडी; तिघांचाही मृत्यू, नगरमधील घटना

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील धक्कादायक घटना जामखेड | नगर सह्याद्री रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जामखेड तालुयातील नायगाव...

बोगस मतदारांच्या आरोपावरून विखे-थोरात भिडले, काय म्हणाले पहा

शिर्डी | नगर सह्याद्री बोगस मतदानाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले...

सिस्पेतील चोरांना पाठीशी घालणारा मोर कोण?; डॉ. विखेंनी साधला खा. लंकेंवर निशाणा

ठेवीदारांच्या पैशासाठी उपोषण का केले नाही? नामोल्लेख टाळत थेटपणे खा. नीलेश लंके यांच्यावर निशाणा...

राजे शिवाजी पतसंस्थेत ८१ कोटी २५ लाखांचा झोल; ४६ जणांची यादीच आली समोर

अपहारास जबाबदार असणार्‍या ४६ जणांची यादीच आली समोर | संचालक मंडळाला आझाद ठुबेने फाट्यावर...