spot_img
ब्रेकिंगपोलिसांना मिळालेली खबर पक्की निघाली, ‘स्प्रिंग ब्रुक लॉज’ मध्ये...धक्कादायक प्रकार

पोलिसांना मिळालेली खबर पक्की निघाली, ‘स्प्रिंग ब्रुक लॉज’ मध्ये…धक्कादायक प्रकार

spot_img

Crime News कल्याणीनगर येथे निवासी भागात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीत लॉजमालकासह तिघे संगनमताने वेश्याव्यवसाय चालवीत असल्याचे म्हटले असूनही, पोलिसांनी केवळ दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कल्याणीनगर येथे ‘स्प्रिंग ब्रुक लॉज’ मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी मिळाली. पोलिस निरीक्षक विजय ठाकर यांच्या सूचनेननुसार येरवडा पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.

लॉजचे व्यवस्थापक अमोल तांबडे (वय २८, रा. श्रीरामपूर, अहिल्यानगर) आणि एजंट बंटी या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ सह, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉजच्या खोली क्रमांक १०२ मध्ये एक २६ वर्षीय पीडित तरुणी आढळून आली. तिला आरोपींनी जबरदस्तीने व्यवसायासाठी ठेवले होते. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पुनर्वसनासाठी पाठविले आहे. दरम्यान, पोलिसांनी छाप्यादरम्यान गुन्ह्याशी संबंधित काही पुरावे जप्त केले. लॉजमध्ये असलेल्या नोंद वहीमध्ये संशयास्पद नोंदी आढळून आल्या.

पोलिसांना संबंधित लॉजवर छापा टाकण्यापूर्वी दोन पंचांना पाचारण केले होते; तसेच बनावट ग्राहकाकडे सात हजार रुपये रोख दिले होते. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा बनावट ग्राहकाकडील सात हजार रुपये आरोपींकडे सापडले. त्या नोटांचे नंबरही जुळले आहेत, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...