spot_img
अहमदनगरदंगलीचे शहर ही ओळख पुसली, तीच मोठी उपलब्धी!

दंगलीचे शहर ही ओळख पुसली, तीच मोठी उपलब्धी!

spot_img

नगरची ओळख मेट्रोसिटी व्हावी ही नव्या पिढीची अपेक्षा अन् जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे माझे कर्तव्य!

आ. संग्राम जगताप : १० वर्षांत विकासाचे व्हिजन दाखवून दिले | दोन समाजांत तेढ निर्माण करणार्‍यांना नगरकरांनी आता कायमचे हद्दपार केलेय

थेट-भेट | शिवाजी शिर्के
सामाजिक समतोल, धार्मिक सलोखा, दहा वर्षात एकही दंगल नाही. दगड सुद्धा कुठे पडला नाही. यापूर्वी याच मुद्यावर निवडणुका झाल्या आणि जिंकल्या. गेल्या दहा वर्षात निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा विकासाच्या मुद्यावर आणला. त्याआधी कायम हिंदू- मुस्लिम आणि जातीय रंग देत निवडणूका जिंकल्या गेल्या. गेल्या दहा वर्षात नगरमधील विविध जाती धर्मातील लोकांमध्ये सलोखा निर्माण करण्याचे काम मी करू शकलो. कोणाची माथी भडकावून राजकीय पोळी भाजण्याचे काम मी कधीच केले नाही आणि करणारही नाही. विकासाच्या मुद्यावर मी पहिल्या निवडणुकीपासून बोलतोय. भावनिक आणि कपोलोकल्पीत मुद्यांना माझ्याकडे थारा नाही. दोन जातींमध्ये, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार्‍यांना, त्यातून पोळी भाजत मते मिळविणार्‍यांना नगरकरांनी आता कायमचे हद्दपार केलेय! विकासाचे मोठे व्हीजन घेऊन मी काम करत आहे. पुढच्या पाच वर्षात नगर शहर शेजारील पुणे, नाशिक आणि औरंगाबादप्रमाणे विकसीत झालेले दिसेल. नगरची ओळख मेट्रोसिटी व्हावी ही नव्या पिढीची अपेक्षा आहे आणि शहराचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. भावनिक आणि जातीय रंग देणार्‍यांना नगरकर आता थारा देणार नाहीत. विकासाचे व्हिजन काय असते हे मी गेल्या दहा वर्षात दाखवून दिले असून पुढच्या पाच वर्षातील मेट्रोसिटीची ओळख हेच माझे ध्येय असणार असल्याचे प्रतिपादन महायुतीचे नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘नगर सह्याद्री’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

कागदावर काम न करता ऑनरेकॉर्ड कामे करतोय
विधानसभेची निवडणूक ही शहराचे भविष्य ठरविणारी आहे. नगरकरांनी टाकलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. येणार्‍या पाच वर्षांत नगर शहराला मेट्रो सिटी बनविण्यासाठी व्हिजन २०२९ महत्वाचे पाऊल ठरेल. विकासाचे व्हिजन घेऊन मी गेल्या दहा वर्षात काम केले. ही सर्व कामे काल्पनिक नसून, ऑन रेकॉर्ड आहेत. कागदावर काल्पनीक चित्र मांडून मी कधीच काम केले नाही. जे काही केले ते ऑनरेकॉर्ड काम केले आहे. जे काम केले आणि ज्या कामांचे मी व्हीजन मांडले आहे, त्याची माहिती कोणीही त्या- त्या शासकीय कार्यालयातून घेऊ शकतो. विविध कामांंच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा केलाय. त्यामुळे विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून कामे सुरू आहेत. ही कामे कागदोपत्री आहेत. माहितीच्या अधिकारात माहिती मागू शकता. कारण हे काल्पनिक व्हिजन नाही.

नगरकरांनो, पुढच्या पाच वर्षांसाठी हे आहेत माझे संकल्प
पाणीपुरवठ्यासाठी फेज ३ पाणी योजनेसाठी ८५० कोटींचा प्रस्ताव, मनपाच्या शाळा डिजिटल व वातानुकूलित करणार, गंजबाजार येथील भाजी मार्केटची अद्ययावत इमारत, आबालवृद्धांसाठी निसर्ग संपन्न उद्यानांचा विकास, सीना नदी परिसरात ऑसिजन पार्कची निर्मिती, प्रदूषणमुक्त ई बससेवा करणार, महिलांसाठी नामांकित गृहउद्योगांमार्फत रोजगारनिर्मिती, १०. बुरुडगाव व मुकुंदनगर भागांमध्ये ज्येष्ठ नागरिक भवन, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणार, पिंपळगाव माळवी येथे ६५० एकर जागेत थीम पार्क उभारणार, डी. एस.पी. चौक व एमआयडीसीमधील सन फार्मा चौक आणि सह्याद्री चौकात दुपदरी उड्डाणपूल, एमआयडीसीचा विस्तार करून मोठे उद्योग आणणार हा माझा नगरकरांना शब्द आहे.

कोणी कितीही ओरड करू देत, माझे काम बोलतेय; हा घ्या त्याचा आरसा
सावेडीत सुरु केलेले अद्ययावत हॉस्पिटलचे काम प्रगतिपथावर, चौकांचे सुशोभीकरण व महापुरुषांची स्मारके उभारण्यास सुरुवात, वाडिया पार्क विकासासाठी १५ कोटींचा निधी, केडगाव येथे नवीन स्पोर्टस् कॉम्प्लेसची निर्मिती करणार, माळीवाडा, बसस्थानक क्रमांक ३ (पुणे), तारकपूर बसस्थानकांच्या नूतनीकरणाचे काम सुरु, जिल्हा ग्रंथालयाची नव्याने उभारणी करण्याचे नियोजन, सावेडीत नाट्यगृहाची निर्मिती करण्याचे काम प्रगतिपथावर, प्रमुख डीपी रस्त्यांचे मजबुतीकरण अंतिम टप्यात, विविध ४२ भागांमधील रस्त्यांची ४०० कोटींची कामे, मुळा धरण ते विळद घाट आणि विळदघाट ते वसंत टेकडीदरम्यान पाइपलाइन, पंपिंग स्टेशन आणि साठवण टायांकरिता १३७ कोटींचा निधी, शहर कचराकुंडीमुक्त करण्यासाठी घंटागाड्या उपक्रम सुरु, मलनिस्सारण व्यवस्थेसाठी नवीन भुयारी गटार योजना, बुरुडगाव येथे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरु आहे. नगरकरांना अभिमान आणि हेवा वाटेल, असे काम गेल्या दहा वर्षात करता आले. पुढच्या पाच वर्षांनंतर नगर शहर बदललेले दिसेल.

वाचन चळवळीसाठी ग्रंथालय अन् कलावंतांसाठी नाट्यगृह
नगर शहराच्या वैभवात भर घालणार्‍या माळीवाडा, बस स्थानक क्रमांक ३ (पुणे), तारकपूर या बसस्थानकांचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. नगर शहरात वाचन चळवळ वाढावी, चांगले संदर्भ ग्रंथ येथे उपलब्ध व्हावेत आणि त्याचा उपयोगन नव्या- जुन्या पिढीतील सर्वांना व्हावा यासाठी जिल्हा ग्रंथालयाची नव्याने उभारणी करण्याचे नियोजन केले आहे. सावेडीत नाट्यगृहाची निर्मिती करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे नाट्यगृह नगर शहरासह जिल्ह्यातील नाट्यकर्मीसाठी मोठे योगदान देणारे ठरणार आहे.

६०० एकर जागेत नवीन एमआयडीसी
राज्य सरकारकडे पाठपुरावा करून विळद परिसरात शासनाकडून ६०० एकर जागा एमआयडीसी विकासासाठी हस्तांतंरीत झाली आहे. यामुळे उद्योग विकासासोबत रोजगार निर्मिती मोठी मदत होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्याचे काम यातून होईल. याशिवाय विजेची बचत करणार्‍या सौरऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात येते आहे.

सेवकाच्या भूमिकेतून काम केले आणि करत राहणार
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आलोय. पुढील काळातही याच पद्धतीने कटिबद्ध राहून नागरिकांना चांगल्या अद्यावत सोयीसुविधा देण्याचे नियोजन केले आहे. शहराचा चेहरा-मोहरा बदलवून शहराची वाटचाल मेट्रो सिटी करण्याच्या दिशेने करण्यासाठी ‘व्हिजन २०२९’ हे दमदार पाउल ठरणार आहे.

महापुरुषांची स्मारके, स्पोटर्स सुविधायुक्त शहर
नगर शहराला ऐतिहासीक वारसा आहे. शहरातील चौकांचे सुशोभीकरण करताना महापुरूषांची स्मारके उभारणीस प्रारंभ केला. क्रीडांगण विकासाचा विषय हाती घेतला आणि वाडिया पार्क विकासासाठी १५ कोटींचे काम लवकरच सुरु होणार आहे तसेच केडगाव येथे नवीन स्पोर्टस् काम्प्लेसची निर्मिती करण्यात येणार आहे.

नगरकरांच्या हितासाठीच सत्तेत गेलो!
राज्यातील सत्तानाट्यात अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय व्यक्तीगत हिताचा अजिबातच नव्हता. राज्यातील सत्तासमिकरणांचा अभ्यास करता विरोधी बाकावर बसलो असतो तर नगर शहरासाठी काहीच करता आले नसते. सत्तेच्या सोबत गेल्याने राज्य सरकारकडून शहराच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला. त्यामुळेच शहरात कोट्यावधी रुपयांच्या निधीतून सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करता आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरमध्ये खळबळ! मतपेट्या आणलेल्या बसमध्ये सापडले नोटांचे बंडल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी...

उमेदवारांची धाकधूक वाढली! नगरमध्ये कुणाच्या अंगावर पडणार गुलाल…

विधानसभेच्या परिक्षेचा शनिवारी निकाल | समर्थकांकडून गुलालाची तयारी | चौकाचौकात दावे प्रतिदावे अहिल्यानगर | नगर...

भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात; संगमनेरमध्ये झळकले फ्लेक्स

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून आता वेध लागलेत ते निकालाचे....

शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला; कुठे घडली घटना

छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री:- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील एका 31 वषय महिलेवर...