मुंबई । नगर सहयाद्री:-
आयटी कर्मचाऱ्यानं पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मानव शर्मा असे मयत तरुणाचे नाव आहे. मृत्यूच्या आधी त्याने गळ्यात दोरीचा फास अडकवत लाईव्ह व्हिडिओ केला, ज्यामध्ये त्याने पत्नीकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली अन् आयुष्य संपवलं.
मानव यांच्या कुटुंबाने आग्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाशिवरात्रीच्या ड्युटीमुळे पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुटुंबाने केला. यानंतर त्यांनी थेट उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार केली, आणि अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एकीकडे टीसीएसमध्ये रिक्रूटमेंट मॅनेजर असलेल्या मानवनं पत्नीच्या त्रासाला कंटाळून ६ मिनिटं ५६ सेकंदाचा लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्या केली. तर दुसरीकडे पत्नीने आरोप फेटाळत, तिनं मानवलाच जबाबदार ठरवलं असून तो मानसिक रुग्ण असल्याचा म्हणत स्वतःचा बचाव केला आहे.