spot_img
अहमदनगरचक्रीवादळ आले आणि होत्याचे नव्हते झाले! शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान, हाता तोंडाशी...

चक्रीवादळ आले आणि होत्याचे नव्हते झाले! शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान, हाता तोंडाशी आलेले…

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शेंडेवाडी येथील शेतकरी संतोष भिमाजी आल्हाट यांच्या दीड एकर दोडका बागेतील अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मंडप उडाल्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी संतोष आल्हाट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा प्रकार लोणी व्यंकनाथ च्या शेंडेवाडी येथील संतोष आल्हाट यांच्या गट नंबर ५९७ या क्षेत्रात नुकसान झाल्याचे समजले.

एकीकडे शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती सुधारत असताना भाजीपाला व इतर पिके कमी कालावधीत घेऊन अधिक उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करत असतानाच निसर्ग मात्र शेतकऱ्यांना हाता तोंडाशी आलेले पीक हिरावून घेत आहे. असाच प्रकार मंगळवार दिनांक ३० जुलै रोजी सायंकाळी साधारणतः चार वाजता अचानक चक्रीवादळ फिरले आणि होत्याचे नव्हते झाले.
लोणी व्यंकनाथ येथील गरीब कुटुंबातील शेतकरी संतोष आल्हाट यांनी दोन महिन्यापूर्वी दोडक्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये दोडक्याची शेती करत असताना या पिकाला बाधा येऊ नये म्हणून चहूबाजूने सुरक्षिततेसाठी मंडप उभारला त्यासाठी या मंडपाला जवळपास दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले.

सदर दोडक्याची पीक बाधित होऊ नये म्हणून वेळोवेळी विविध प्रकारच्या फवारणी केल्या. आता हे पीक काही दिवसातच हाती लागणार होते. परंतु अचानकच्या चक्रीवादळाने जवळपास साडेपाच ते सहा लाख रुपयेचे संबंधित शेतकऱ्यांना मिळणार होते. परंतु अचानक चक्रीवादळाने दोडका पिकावरील मंडप उडून गेला या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.दरम्यान या नुकसानग्रस्त पिकाची प्रत्यक्ष दर्शनी पाहणी केल्यानंतर संबंधित शेतकरी संतोष आल्हाट व त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. या दोडक्याच्या उत्पन्नासाठी आल्हाट कुटुंबीयांनी तळहाताप्रमाणे या पिकाला जोपासले. त्यामध्ये सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे दोडका पिकाची संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याने उत्तम प्रकारे जोपासना केली.

आता हे पीक काही दिवसातच हाती लागणार होते. परंतु चक्रीवादळाने दोडका पिकावरील छेत कोसळल्याने संपूर्ण दोडका पीक हस्तव्यस्तपणे पडले. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासन नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी संतोष आल्हाट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतमजुराचा मुलगा क्लासवन अधिकारी!; दीपक विधातेची ‘एसीएफ’ पदावर निवड

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- कर्जत तालुक्यातील छोट्या चापडगाव या गावातून उगवलेली प्रेरणादायी कहाणी सध्या...

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....