Crime News: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार आणि नंतर निघृणपणे खून केल्याची घटना घडली होती. संतापलेल्या अज्ञात व्यक्तींनी याप्रकरणातील नराधम आरोपीचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टाळला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मांजरेवाडीतील संतापजनक घटनेनंतर शुक्रवार (दि. १८) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला. घराच्या खिडकीतुन आगीचे बोळे आत फेकल्याने घरातही आग लागली. यावेळी पोलिसांसह आग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
आरोपीच्या घरासमोर दोन पोलीसांचा बंदोबस्त तैनात करत घराला संरक्षण देण्यात आले आहे. गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही, अशी भुमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली आहे