अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. एकाने थेट ट्रॅक्टर अंगावर घालून आपल्या पत्नीची हत्या केली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातील कारेगावत ही धक्कादायक घटना घडली. सुशिला शिवनाथ भवर, असे मृत पत्नीचे नाव आहे. तर शिवनाथ कारभारी भवरअसे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे सदरची घटना 18 डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली. पती शिवनाथ गावात दारू पिण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन निघाला असता पत्नी सुशिलाने पतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या शिवनाथने पत्नी सुशिलाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिची हत्या केली. त्यात तिचा दर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी महिलेचा भाऊ मल्हारी हरिभाऊ दरंदले (राहणार कौठा, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली असून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात शिवनाथ कारभारी भवर याच्या विरोधात कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी करत आहे.