spot_img
ब्रेकिंगउन्हाचा चटका वाढवणार! हवामान खात्याचा धडकी भरवणारा अंदाज

उन्हाचा चटका वाढवणार! हवामान खात्याचा धडकी भरवणारा अंदाज

spot_img

Weather Update: राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून, रत्नागिरी येथे आज देशातील सर्वाधिक ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. किमान तापमानातही वाढ झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मात्र त्याचबरोबर हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा दिलाय. रविवार आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने म्हटलंय.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत उद्यापासून गुरुवारपर्यंत काही भागांत हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित ठिकाणी कडाक्याचं ऊन आणि शुष्क वाऱ्यांमुळे तापमानवाढीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांतही काही प्रमाणात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होणे शक्य आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि आग्नेयेकडून राहण्याची शक्यता आहे. इतर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्य व ईशान्येकडून राहील.

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ २१ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २५ अंश सेल्सिअस आहे. त्यावरून ‘ला-निना’चा प्रभाव अद्याप आहे. त्यामुळे पूर्वमोसमी व मोसमी पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार इशान्य भारतात सध्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे मेघालय, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सरकल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाबांच्या शिर्डीत चाललंय काय?; गावात खळबळ, मध्यरात्री काय घडलं..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी येतात, त्याच शिर्डी...

१० मार्चला सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; लाडक्या बहि‍णींना २१०० देणार?, सल्लागार समितीची बैठक

State Budget Session : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. 3 मार्च...

शिवसेनेत आउटगोइंग नंतर पुन्हा मोठे इन्कमिंग; किरण काळे यांचा शिवसेनेत प्रवेश…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, आक्रमक नेते किरण काळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेते...

सोनाराच्या दुकानात दरोडा! हरियाणाच्या टोळीचा कहर, ‘म्होरक्या’ गजाआड

Maharashtra Crime News: सोन्याच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून भर दिवसा दरोडा टाकत तिघांनी सराफास...